1. कृषीपीडिया

धेंचा ,हरभरा घेतल्या नंतर आडसाली ऊसाचे नियोजन

हरभरा निघाल्या नंतर दोनदा उभी आडवी नांगरट करून जमीन तापवत ठेवली आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
धेंचा ,हरभरा घेतल्या नंतर आडसाली ऊसाचे नियोजन

धेंचा ,हरभरा घेतल्या नंतर आडसाली ऊसाचे नियोजन

हरभरा निघाल्या नंतर दोनदा उभी आडवी नांगरट करून जमीन तापवत ठेवली आहे.पूर्ण एक वर्ष जमिनीला विश्रांती मिळाली.त्यामुळे मातीमध्ये भरपूर ताकत आलेली आहे.एका वर्षात धेंच्या, व हरभरा असे दोन द्विदल वर्गीय बेवड झाले.हरभरा केल्यामुळे जमिनीत ओलावा (मॉयशर ) राहत नाही,जमीन पूर्ण वाळते. खोलपर्यंत भेगा पडल्यामुळे नैसर्गिक सबसोयलरचे काम झाले. नांगरट करत असताना मोठं मोठी ढेकळे निघाली,तशी ढेकळे इतर कुठल्या ही पीक घ्या निघत नाहीत.शेतात जर लव्हाळा (नागरमोथा)जास्त प्रमाणात असेल तर हरभऱ्याचे पीक घ्या.लव्हाळा पूर्ण पणे जातो.

एक एकर हरभरा 10ट्रेलर शेणखता बरोबर आहे. आता या क्षेत्रात जून महिन्यात आडसाली ऊस करायचे आहे.त्यासाठी सुपरकेन नर्सरीचे नियोजन केले आहे. कारण त्या जमिनी मध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने लावण केली की बऱ्याचदा तूटाळ होते.त्यामुळे तिथे शक्यतो रोप लावण करतो. यावेळी 25मे रोजी बेडवरती सुपरकेन नर्सरी केली आहे.नर्सरी साठी 6फुटाचे बेड पाडले, व त्या बेड वरती कुदळी ने चर घेऊन एक डोळा लावण केली. कांडी मांडत असताना कांडीला कांडी मांडली आहे. जर दोन कांडी मध्ये अंतर ठेवले तर नर्सरीला जास्त क्षेत्र लागते.या पद्धतीने एक एकर लावण करण्यासाठी 1 गुंठा क्षेत्र लागते. एका बेड वरती 15ते16 ओळी बसतात.कांडी वरती 1.5इंच मातीने बुजवले आहे.

6फुटी बेड पडल्या नंतर त्या बेड वरती 24/24/0 व खोडकिडीच्या नियंत्रणासाठी फरटेरा,क्लोरो ग्रान्यूल व थोडे शेणखत टाकून माती मध्ये मिक्स केले. 15दिवसा मध्ये सर्व उगवून पूर्ण झाली. लावण करतेवेळी बीजप्रक्रिया करणे शक्य झाले नाही त्यामुळे ऊसाची उगवण झाल्या नंतर कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या आळवणी केली आहे.उन्हाळ्याचे दिवस व उष्णता जास्त असल्यामुळे व हलकी जमीन असल्यामुळे सुरुवातीच्या 8दिवसात सकाळ व संध्याकाळ दोनदा पाणी मारावे लागले.आता दिवसातून एकदां पाणी मारतो.1महिन्याचे रोप झाल्यानंतर रोप लावण करायचे नियोजन आहे.रोप लावण करताना जादा(एक्स्ट्रा )रोपे तयार केल्यामुळे लहान अशक्त रोप,कमी जाडी असलेले रोप न लावता जाड कोंब असलेले सशक्त

रोपांचे सिलेक्शन करून लावता येते.त्याचा फायदा एकसारखा जाडीचे फुटवे ,एकसारखी जाडीचे ऊस मिळतात.तसेच गवताळ वाढीचे नियंत्रण होते. सिलेक्शन करून लावलेल्या ऊसामध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली असते.त्याचा खोडवा देखील चांगला येतो.धेंच्या व हरभरा या पिकांचे फेरपालट केल्याने ऊसाची दोन पिके चांगली येतात.शेणखत न टाकताही आडसाली ऊसाचे एकरीं 100टन व खोडव्याचे 60ते 65टनां पर्यंत उत्पादन मिळते. नंतर एक वर्ष विश्रांती असे चक्र सातत्याने सुरू आहे. अलीकडे पाचट पेटवणे पूर्ण पणे बंद केले आहे.त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढत चालले आहे. जमिनीचा पोत टिकवून कमी खर्चात ऊसाचे चांगले उत्पादन मिळत आहे.

 

शेतीनिष्ठ श्री सुरेश कबाडे.  

रा.कारंदवाडी ता:-वाळवा, जि:-सांगली

मोबा:- 9403725999,

मोबा79 7261 1847

English Summary: Dhencha, planning of Adsali sugarcane after taking gram Published on: 07 July 2022, 10:58 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters