MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

बटाटा लागवड करायची? तर मग जाणून घ्या बटाट्याच्या या दहा जातींविषयी

बटाटा लागवड करायची? तर मग जाणून घ्या बटाट्याच्या या दहा जातींविषयी बटाटा असे भाजीपाला पिक आहे त्याचा उपयोग आहारामध्ये कुठल्याही ऋतूत केला जातो. बटाट्याची शेती मुख्य स्वरूपात भारतातील उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि आसाम मध्ये केली जाते. जगाचा विचार केला तर बटाटा उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
potato veriety

potato veriety

बटाटा लागवड करायची? तर मग जाणून घ्या बटाट्याच्या या दहा जातींविषयी

 बटाटा असे भाजीपाला पिक आहे त्याचा उपयोग आहारामध्ये कुठल्याही ऋतूत  केला जातो. बटाट्याची शेती मुख्य स्वरूपात भारतातील उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि आसाम मध्ये  केली जाते. जगाचा विचार केला तर बटाटा उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो.

 केंद्रीय बटाटा अनुसंधान संस्थान यांनी बटाट्याच्या 10 प्रगत प्रजाती विकसित केले आहेत. ज्या प्रजाती जास्तीचे उत्पन्न देतात. केले का दाबून बटाट्याच्या दहा उन्नत प्रजाती  विषयी माहिती घेऊ.

 बटाट्याच्या प्रगत जाती

  • कुफरी गंगा:

बटाटा च्या प्रजाती पासून हेक्‍टरी 300 ते 400 क्विंटल उत्पादन मिळते. बटाट्याची ही जात 80 ते 90 दिवसात  काढणीस तयार होते. बटाट्याच्या इतर वरायटी पेक्षा उत्पादनाच्या बाबतीत अव्वल आहे.

  • कुफरी मोहन :

बटाट्याच्या या प्रजाती पासून प्रतिहेक्‍टर साडेतीनशे ते चारशे क्विंटल उत्पादन मिळते.जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेयाजातीवर रोगांचा प्रभाव फार कमी असतो.

3-कुफरी निळकंठ :

 या प्रजाती पासून हेक्‍टरी 350 ते 400 क्विंटल उत्पादन मिळते. या प्रजातीमध्ये  अँटिऑक्सिडंट गुण असतात. जे आपल्या शरीरासाठी महत्वाच्या असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. ही प्रजाती प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगड या राज्यात लावली जाते.

4-कुफरीपुखराज :

 बटाट्याची ही वरायटी इतर बटाट्याच्या प्रजाती पेक्षा लोकप्रिय आहे या जातीची लागवड जास्त प्रमाणात गुजरात राज्यात केली जाते. प्रति एकर 140 ते 160 क्विंटल उत्पादन मिळते.ही जात 90 ते 100 दिवसांत काढणीस तयार होते

5-कुफरी संगम:

 बटाट्याची ही जात उत्तर प्रदेश,राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये लावली जाते. या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही पोस्ट गुणधर्मांनी युक्त असून स्वादिष्ट सुद्धा असते. बटाट्याची ही जात शंभर दिवसात काढणीस तयार होते.

6-कुफरी ललित :

 बटाट्याच्या या जातीपासून प्रति हेक्‍टरी 300 ते साडेतीनशे क्विंटल उत्पादन मिळते.हीजात बटाट्याच्या  इतर जातींपेक्षा जास्त उत्पादन देते

7-कुफरीलिमा :

 बटाट्याची प्रजात हेक्‍टरी 300 ते 350 क्विंटल उत्पादन देते. या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हवामानातील बदलाचा याच्यावर जास्त परिणाम होत नाही.

8-

कुफरी चिप्सोना:

 बटाट्याच्या या जातीपासून प्रति हेक्‍टरी 300 ते साडेतीनशे कुंटल उत्पादन मिळते. या जातीची लागवड भारतातील उत्तर प्रदेश,  पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यात केली जाते.

8-कुफरी गरीम:

हेक्टरी या जातीपासूनन तीनशे ते साडेतीनशे क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.या जातीची लागवड भारतातील उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यात केली जाते. या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची साठवणुक जास्त दिवस करता येते.

English Summary: devolped veriety of potato give benifit to farmer Published on: 25 September 2021, 11:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters