1. कृषीपीडिया

वांग्याच्या करा या जातींची लागवड होईल बक्कळ कमाई

brinjaal

brinjaal

 वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात म्हणजेच खरीप, रब्बी आणि उन्हाळातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्र पीक म्हणून वांग्याची लागवड करतात. आहारामध्ये वांग्याची भाजी, भरीत, वांग्याची भाजी इत्यादी अनेक प्रकारे  उपयोग होतो. या लेखात आपण वांग्याच्या काही प्रगत जातींची माहिती घेणार आहोत.

 वांग्याच्या काही सुधारित जाती

  • मांजरी गोटा:

महाराष्ट्रामध्ये या वाणाची  लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.हेवान पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील स्थानिक जातीपासून निवड पद्धतीने विकसित करण्यात आली आहे.या जातीचे झाड बुटके आणि पसरट असते. पाने आणि फळांच्या देठावर काटे असतात. मध्यम ते मोठ्या आकाराची आणि गोल असतात. फळांचा रंग जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर चार ते पाच दिवस टिकतात. या वाणाचा कालावधी लागवडीपासून 150 ते 170 दिवसांचा असून हेक्‍टरी सरासरी 27 ते 30 टन उत्पादन मिळते.

  • वैशाली:

वांग्याच्या या पानाचे झाड बुटके आणि पसरट असून पाने,खोड आणि फळांच्या देठावर काटे असतात. फुले आणि फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून फळांचा रंग  आकर्षक जांभळा असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे झुबक्यात लागतात व 55 ते 60 दिवसांत काढणीस तयार होतात. या जातीच्या फळांची गुणवत्ता साधारण असली तरी उत्पादन भरघोस आणि लवकर येणार असल्यामुळे ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.

  • प्रगती:

प्रगती हवान वैशाली आणि मांजरी गोटा यांच्या संकरातून तयार करण्यात आला आहे. या जातीची झाडे उंच आणि काटक असतात. पाने गडद हिरव्या रंगाची असून पाने, फळे आणि फांद्यांवर काटे असतात.या जातीची फुले आणि फळे झुबक्यांनी येतात. फळांचा आकार अंडाकृती असून रंग आकर्षक जांभळा व फळांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. या जातीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन हे 30 ते 35 टनांपर्यंत मिळते.  हेवान बोकड्या आणि मर रोगास कमी प्रमाणात बळी पडते.

  • अरुणा:

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विकसित झालेल्या वांग्याच्या या जातीची झाडे मध्यम उंचीचीअसून फळे भरपूर आणि झुबक्यातलागतात.फळे मध्यम आकाराची, गोलाकार अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो. या वाणापासून हेक्‍टरी 25 ते 30 टन उत्पादन मिळते.

 

  • ए. बी. व्ही. X:

पुसा पर्पल क्लस्टर आणि मांजरी गोटा यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केलेले हे वाण असून फळे गुच्छात लागत असल्यामुळे उत्पादन क्षमता 25 ते 30 टन प्रति हेक्‍टर एवढे आहे. फळे लहान, गोल, काटेरी असून पानांवर पांढरे व जांभळ्या रंगाचे पट्टे असतात. हा वाण पर्णगुच्छ आणि शेंडे आळीला कमी प्रमाणात बळी पडतो.

  • अनुराधा:

अनुराधा हा वांग्याचा वान मांजरी गोटा व पुसा पर्पल क्लस्टर त्यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केला गेला आहे. या वाणाची फळे गोल, काटेरी आणि आकर्षक रंगाची लहान फळे असणारा हा वाण पर्णगुच्छ व शेंडे आळी ला कमी प्रमाणात बळी पडतो. या वाणाची उत्पादनक्षमता 25 ते 30 टन प्रति हेक्‍टरी आहे.

 

 

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters