शेती (Farming) क्षेत्रात नवीन शोध लावण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन (Farmers' production) वाढवण्यासाठी नवनवीन संशोधन केले जात आहे. गहू, बाजरी, ज्वारी या पारंपरिक पिकांमध्ये अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी वेगवेगळ्या वाणांचे शोध लावले जात आहेत. गहू उत्पादकांचे (Wheat grower) आता अच्छे दिन येणार आहेत. कारण गव्हाच्या नवीन ३ जाती (3 new varieties of wheat) विकसित केल्या आहेत.
देशात हंगामानुसार पिके घेतली जातात. रब्बी हंगामात गव्हाला (wheat) पोषक वातावरण असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड केली जाते. जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी वेगवेगळ्या वाणांची लागवड करत असतो.
कृषी शास्त्रज्ञांकडून सातत्याने नवनवीन वाण शोधले जात आहेत. या वर्षी ऑक्टोबरपासून देशात गव्हाची पेरणी सुरू होणार आहे. त्या अगोदर शेतकऱ्यांसाठी एक आनांदाची बातमी आहे. हेक्टरी ८२ क्विंटल उत्पादन देणाऱ्या गव्हाचे नवीन ३ वाण विकसित केली आहेत.
नादच खुळा! १ एकर उसाच्या फडावर आठ मिनिटांत फवारणी
गव्हाच्या या ३ जातींना यावर्षी जास्त मागणी
भारतीय गहू आणि कर्नालच्या बार्ली रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनुज कुमार म्हणतात की गव्हाच्या या तीन जातींना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मागणी आहे. या तीन जाती आहेत –
१. करण वंदना (DBW 187)
२. करण नरेंद्र (DBW 222)
३. पुसा यशस्वी (HD 3226)
करण वंदना
या गव्हाच्या जातीमध्ये प्रथिने, लोह, जस्त आणि खनिजे यांसारखी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 12 टक्क्यांपर्यंत असते तर इतर जातींमध्ये प्रथिनांचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपर्यंत असते.
मारुती सुझुकीच्या या गाड्या देतायेत सर्वाधिक मायलेज; किंमतही आहे कमी
करण नरेंद्र
गव्हाच्या इतर जातींपेक्षा जास्त प्रथिने व्यतिरिक्त, जैविक दृष्ट्या जस्त, लोह आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण खनिजे असतात. त्याची चपाती दर्जेदार बनते आणि खायलाही चविष्ट असते.
पुसा यशस्वी
पुसा यशस्वी जातीला HD 3226 (HD-3226) असेही म्हणतात. ही जात गहू आणि बार्ली (उच्च उत्पन्न देणारी गव्हाची विविधता 2022) संशोधन संस्था, कर्नाल यांनी विकसित केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! मंत्रालयाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा अखेर उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू
मोठी बातमी! कांदा 400 रुपये आणि टोमॅटो 500 रुपये किलो
Share your comments