1. कृषीपीडिया

पावसाअभावी देशात लागवड क्षेत्रात घट

हवामान खात्याने यंदा मॉन्सून समाधानकारक राहणार असल्याचे सूतोवाच हंगामाच्या आधीच केले होते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पावसाअभावी देशात लागवड क्षेत्रात घट

पावसाअभावी देशात लागवड क्षेत्रात घट

हवामान खात्याने यंदा मॉन्सून समाधानकारक राहणार असल्याचे सूतोवाच हंगामाच्या आधीच केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच आता जून महिना लोटल्यानंतरही देशाचा बराच भाग कोरडा राहिला आहे. देशात सद्यःस्थितीत या महिन्यातील सरासरीच्या दहा टक्‍के कमी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम पेरण्यांवर झाला असून याच कालावधीतील गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात पाच टक्‍के घट झाली आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून लागवड क्षेत्राची ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार,

शुक्रवारपर्यंत (ता. १) देशभरात २५९.६१ लाख हेक्‍टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत २७२.२१ लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. याचा विचार करता लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीपेक्षा ४.६३ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. डाळवर्गीय पिकाच्या लागवड क्षेत्रात ६.९८ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. हे क्षेत्र वाढत २८ लाख हेक्‍टरवर पोहोचले आहे. देशात डांगर (काळा भोपळा, कोहळे) यांचे लागवड क्षेत्र २७ टक्‍क्‍यांनी घटले असून यंदा ४३.४५ लाख हेक्‍टरवर त्याची लागवड झाली आहे. याचाच सर्वाधिक परिणाम एकूण खरीप लागवड क्षेत्र कमी होण्यावर झाल्याचे सांगितले जाते.

पाऊस चांगला झाल्यास यापुढील काळात डांगर लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तेलबियावर्गीय पिकांच्या क्षेत्रातही सहा टक्‍क्‍यांनी घट नोंदविण्यात आली आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र याच कालावधीत ५०.४ लाख हेक्‍टर इतके होते. यावर्षी ते ४६.२६ लाख हेक्‍टर इतकेच मर्यादित राहिले आहे. कापूस लागवड क्षेत्रात मात्र ३.८१ टक्‍के वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कापूस लागवड ६१.७३ लाख हेक्‍टर असताना यंदा ती ६४.०८ लाख हेक्‍टरवर पोहोचली आहे. पुढील आठवड्यात लागवड क्षेत्र अधिक विस्तारेल,

अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. विशेष म्हणजे देशभरात १ जूनपासून मॉन्सून सक्रिय झाला. परंतु जुलै महिन्याला सुरुवात झाल्यानंतरही देशाच्या अनेक भागांत त्याची वाटचाल समाधानकारक नाही. परिणामी पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.१ जुलैपर्यंतची लागवड स्थिती (चौकटीत यंदाची तर चौकटीबाहेर गेल्यावर्षीची)डांगर ः ५९.५६ (४३.४५)डाळवर्गीय ः २८.०६धान्य ः १४.२३ (१८.०४)तेलबियावर्गीय ः ५०.२४ (४६.२६)ऊस ः ५३.४ (५२.९२)कापूस ः ६१.७३ (६४.०८)

English Summary: Decreased area under cultivation in the country due to lack of rainfall Published on: 08 July 2022, 10:38 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters