1. कृषीपीडिया

पंचनाम्याचे थोटाग बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार मदत द्या : स्वाभिमानी ची मागणी.

अन्यथा स्वाभिमानी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात कोणत्याही क्षणी आंदोलन करू.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
पंचनाम्याचे थोटाग बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार मदत द्या : स्वाभिमानी ची मागणी.

पंचनाम्याचे थोटाग बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार मदत द्या : स्वाभिमानी ची मागणी.

अन्यथा स्वाभिमानी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात कोणत्याही क्षणी आंदोलन करू.शेगाव तालुक्यात मोठया प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असेल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होत आहे.यावर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे. वेळोवेळी पडलेला मुसळधार पाऊसामुळे शेकडो एकर जमिनी खरडुन गेल्या. येवढ्यावरच न थांबता पाऊस सतत

सुरू राहल्याने पिकांची वाढ खुटली. वाण किळीने लाखो एकरातील सोयाबीन सारखे पिके फस्त केली.Varieties germinated millions of acres of crops such as soybeans. कापूस, सोयाबीन,तुर, ज्वारी, उडिद,मुंग इत्यादी पिकासह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. 

हे ही वाचा - कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवावे - अ‍ॅड. भैय्यासाहेब पुजदेकर

या अचानकपणे आलेल्या संकटाने शेतकरी चिंताग्रस्त आहे. महागाईचा आकडा गगणाला भिडला आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही. आरोग्याचा खर्च, मुलांचे शिक्षण, विश्व दारिद्र्य आले

असल्याने मुला मुलिचे थांबलेले लग्ण, त्यामुळे या माणसिकतेने शेतकरी खचुन गेले असल्याने या सर्व सामना कसा करावा हा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांनसमोर ठासुन उभा आहे.

हे ही वाचा - देऊळगाव माळी महसूल मंडळात ढगफुटी; पावसाने उडवली दाना दान, हजारो हेक्टर वरील पिकांची नासाडी.

करीता सरकारने वेळ काढु थोटांग बंद करून विना विलंब शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या.पिक विमा कंपन्यांनी जाचक अटी न लावता शंभर टक्के पिक विमा मंजूर करून तत्काळ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन कोणत्याही क्षणी शेंगाव तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आला असून या वेळेस शेगाव तालुक्यातीलीत शेतकरी मोठया संख्येने उपस्तित होते.

English Summary: Declare wet drought by closing panchnama and give 50 thousand per hectare assistance to farmers: demand of Swabhimani. Published on: 19 September 2022, 05:09 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters