1. कृषीपीडिया

विजांपासून सावध करणारं दामिनी ॲप , जाणून घ्या सविस्तर

अमित शाह यांनी लोकांना दामिनी ॲप वापरण्याचा सल्ला दिला. या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याची शक्यता ओळखून स्वत:चे प्राण वाचवता येऊ शकतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
विजांपासून सावध करणारं दामिनी ॲप , जाणून घ्या सविस्तर

विजांपासून सावध करणारं दामिनी ॲप , जाणून घ्या सविस्तर

अमित शाह यांनी लोकांना दामिनी ॲप वापरण्याचा सल्ला दिला. या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याची शक्यता ओळखून स्वत:चे प्राण वाचवता येऊ शकतात.

पावसाळा सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये गृह मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, तसेच हवामान विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अमित शाह यांनी लोकांना दामिनी ॲप वापरण्याचा सल्ला दिला. या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याची शक्यता ओळखून स्वत:चे प्राण वाचवता येऊ शकतात. (Damini app alerts of lightning strikes thunderstroke thunderclap home minister Amit Shah recommends use Damini app)

हवामान विभागाकडून दामिनी ॲप तयार करण्यात आले आहे. हे एक मोबाईल ॲप आहे. लोकांचे विजेपासून संरक्षण व्हावे म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी या संस्थेने हे ॲप विकसित केले आहे.

दामिनी अ‌ॅप काम कसे करते ?

पाऊस सुरु झाल्यानंतर दामिनी ॲपच्या माध्यमातून वेळेआधीच वीज, मेघगर्जना आदींची माहिती मिळते. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी या संस्थेने देशातील एकूण 48 सेंसरच्या मदतीने एक लाईटनिंग लोकेशन नेटवर्क तयार केले आहे. 

या नेटवर्कच्या मदतीने दामिनी ॲपला विकसित करण्यात आले आहे. हे अॅप आपल्या 40 किलोमीटरच्या परिसरातील वीज पडण्याच्या संभाव्य स्थानांबद्दल माहिती देते. विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेचीही हे अॅप माहिती देते.

दामिनी ॲप कसे वापरावे ?

दामिनी ॲप वापरायचे असेल तर आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करावे लागेल. ॲण्ड्रॉईड युजर्स या ॲपला गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून तर ॲपल फोनचे वापरकर्ते या ॲपला ॲपल स्टोअरच्या माध्यमातून डाऊनलोड करु शकतील. ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुमची नावनोंदणी होईल. त्यासाठी तुमचे नाव, लोकेशन तसेच इतर माहिती भरावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर हे ॲप काम करणे सुरु करेल. 

 हे ॲप तुमच्या लोकेशननुसार तुमच्या आजूबाजूच्या चाळीस किलोमीटरच्या परिसरात वीज पडण्याच्या शक्यतेची ऑडिओ मेसेज तसेच एसएमएसच्या माध्यमातून माहिती देते.

इशारा मिळाल्यानंतर काय काळजी घ्यावी ?

दामिनी ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळताच खबरदारी घेणे गरजेचे आहे. या काळात खुले शेत, झाडाखाली, पर्वतीय भागाजवळ उभे राहू नये. तसेच धातूचे भांडे घासणे कटाक्षाने टाळावे. या काळात अंघोळसुद्धा करु नये. जेथे पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी जाणे टाळा. कोरड्या जागेवर उभे राहा. विजेचे तार तसेच खांब यापासून दूर राहा. अशा वेळी घरी जावे. घरी जाणे शक्य नसेल तर खुल्या जागेत कानावर हात ठेवून गुडघ्यांवर बसून राहावे.

App link :https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini

English Summary: Damini app that warns of lightning, learn more Published on: 24 February 2022, 10:09 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters