निसर्ग प्रत्यक गोष्ट एकदम वेवस्थित ठरल्या प्रमाणे आणि नियोजितपणे पार पाडत असतो. आपण सर्वजण निसर्गाचाच एक भाग आहोत हे जरी आपण विसरलो तरी नियती मात्र आपल्याला विसरत नाही आणि त्यातून ही आपण विसरलो तरी आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. जसे आपण समाजशील प्राणी आहोत तसेच निसर्गाचाच एक भाग आहोत हे विसरून कसे चालेल.
आज प्रत्यकजण स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय पण निसर्ग मात्र सर्वाना टिकवण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. प्रत्यक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे .
आणि प्रत्यक जीवच दुसऱ्या जिवाप्रति काही तरी कार्य आहे. अस म्हणतात कधीच कोणती गोष्ट एकट्याने होत नाही त्यात सर्वांचा सहभाग असतो.
आज आपले ही निसर्गाप्रति एक छोटं अस काम आहे ते म्हणजे आज जे पक्षी वाढत्या तापमाना मुळे त्रस्त आहेत त्या निष्पाप निस्वार्थी जीवाला थोडा हातभार तो म्हणजे आपल्या शेतात ,घराच्या अंगणात अथवा ग्यालरीत ,टेरिस वर पिण्यासाठी पाणी व थोडे दाणे ठेवणे. जरी आज पक्षी आले नाहीत तरी काही दिवसात त्यांना जनवते व हळू हळू पक्षी येत जातात.
कारण-
पक्षी उष्माघात होऊन मरण पावतात आणि पक्षी हे निसर्गाचा एक दिसायला छोटा वाटणारा पण मोठा भाग आहेत. पक्षी हे शेतातील 65टक्के कीड व इतर घातक विकृती नष्ट करण्याच काम करतात त्यामळे कीड व रोग नाशकावरील होणार खर्च वाचतो
निसर्गातील अन्न साखळी मधील महत्वाचा दुवा पक्षी आहेत. हवामानातील बदल आणि त्या बदला नुसार जीवन पद्धती हे पक्ष्या कडून शिकण्यासारखं आहे.
पक्षी हे निसर्गाचे हवामान खाते आहे ज्यांच्या निरीक्षणावरून आपण या वर्षी च्या हवामानाचे तर्क लावू शकतो. भविष्यात पक्ष्याची संख्या कमी होत राहिली तर आपल्याला ,शेतीला कीड रोग सारख्या मोठ्या विषयाला सामोरे जावं लागू शकत.
उपाय- उन्हाळ्याच्याच दिवसात नव्हे तर बारा महिने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व अन्नची(दाणे चारा) सोय करणे आणि पक्ष्याची होणारी शिकार थांबवणे.
शेतकरी सम्पर्क योजना
सरदार दादासाहेब माने कृषी तंत्रनिकेतन रहिमतपूर, ता .कोरेगाव जि. सातारा
Share your comments