1. कृषीपीडिया

राम राम शेतकरी मित्रांनो ऐकलंत का इलायची लागवड आपणांस बनवु शकते मालामाल….!

इलायची (Cardamom) एक मसाल्याचा पदार्थ आणि चवीचा बादशाह म्हणुन ओळखला जातो. क्वचितच एखादा व्यक्ती असेल ज्याला इलायचीचा चहा(Elaichi Tea) आवडत नसणार, लोक खुप चवीने इलायचीचा चहा पिणे पसंत करतात. एवढेच नाही इलायची जर का एखाद्या भाजीत टाकली तर त्या भाजीचा सुगंध आणि चव बस! और क्या कहने? इलायचीचे आयुर्वेदिक महत्व पण खुप आहे, म्हणुन इलायचीची मागणी ही बाजारात नेहमी बनलेली असते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
courtesy-agri farming

courtesy-agri farming

इलायची (Cardamom) एक मसाल्याचा पदार्थ आणि चवीचा बादशाह म्हणुन ओळखला जातो. क्वचितच एखादा व्यक्ती असेल ज्याला इलायचीचा चहा(Elaichi Tea) आवडत नसणार, लोक खुप चवीने इलायचीचा चहा पिणे पसंत करतात. एवढेच नाही इलायची जर का एखाद्या भाजीत टाकली तर त्या भाजीचा सुगंध आणि चव बस! और क्या कहने? इलायचीचे आयुर्वेदिक महत्व पण खुप आहे, म्हणुन इलायचीची मागणी ही बाजारात नेहमी बनलेली असते.

 ह्या बहु्गुनी इलायचीला भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की, वेलदोडा, वेलची, विलायची,इलाची, येला इत्यादी. मित्रांनो इलायचीची शेती करून आपण लखपती देखील बनू शकता! मग शेतकरी मित्रानो (Farmer) तुम्हीही उत्सुक असणार इलायचीच्या लागवडीविषयी जाणुन घेण्यासाठी. आम्हाला माहितीय आमच्या शेतकरी बांधवांना अशाच नवनवीन पिकांची माहिती घ्यायला आवडत चला तर मग जाणुन घेऊया इलायची लागवडीची सर्व प्रोसेस.

 

महाराष्ट्र! (Maharashtra) महान लोकांचं राष्ट्र आणि त्यात वसलेलं कोकण जणु स्वर्गाची प्रतिकृतीच, आपल्या सुंदरतेसाठी आणि प्रयटणासाठी प्रख्यात कोकण मसाल्याच्या शेतीसाठी पण प्रख्यात आहे,कोकणात अनेकानेक मसल्याच्या पदार्थांची लागवड केली जाते आणि शेतकरी बांधव ह्या पिकातून चांगली मोठी कमाई करतातं. अशाच मसाला पिकांपैकी एक म्हणजे इलायचीचे पिक. इलायचीला मसाला पदार्थांची राणी म्हणुन संबोधलं जातं आणि ते बरोबरच आहे इलायचीला आहेच तशी चव. असे असले तरी इलायची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आवर्जून सांगावस वाटत की, ह्या पिकातून चांगले उत्पादन प्राप्त करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने ह्याची लागवड करणे मात्र आवश्यक असते.

 कोणत्या प्रदेशात होते बरं इलायचीचे बम्पर उत्पादन?

कृषी शास्त्रज्ञांच्या मते, जर इलायचीच्या शेतीतुन आपणांस हमखास आणि चांगले उत्पादन हवे असेल तर, इलायचीची लागवड (Elaichi Cultivation) अशा भागात करा, जिथे किमान तापमान 10 डिग्री सेल्सियस आणि कमाल तापमान 35 डिग्री सेल्सियसच्या आसपास असते. इलायचीचे झाड एक छायादार झाडासारखे असते. म्हणुन जर तुम्ही नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये इलायचीची लागवड केली तर ती तुम्हाला खुप फायदेशीर ठरेलं. जिथे तुम्ही इलायची लावणार आहात तिथे सूर्याची किरणे थेट झाडावर पडणार नाहीत याची काळजी घ्या. जर समजा तुम्ही सुपारीच्या बागात इलायची लावत असाल तर समजा तुम्ही 3 x 3 मीटर अंतरावर सुपारी लावली आहे मग

 

 

प्रत्येक दोन झाडांच्या मध्ये एक इलायचीचे रोप लावा हे योग्य मापं असू शकते. आणि सुपारीची  लागवड सखोल करावी किंवा बागेत मोकळ्या जागेत इतर झाडे लावावीत.

 इलायची पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे ठेवावे? Water Management For Elaichi Crop

पावसाळा संपल्यानंतर लगेच इलायची पिकासाठी पाण्याची व्यवस्था करावी. ही झाडे पाण्याचा दाब अजिबात सहन करत नाहीत.  म्हणून, मातीमध्ये नियमित ओलावा सुनिश्चित करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.  जर तुमची जमीन चांगली सुपीक असेल तर चार दिवसांतून एकदा पाणी देणे योग्य आहे.

 इलायची पिकाची काढणी कधी होणार? Harvesting Of Elaichi

कृषी विभागाच्या मते, जेव्हा इलायचीची फळे म्हणजेच इलायची काढणीसाठी तयार होतात तेव्हा इलायची हे हिरवे आणि पिवळे होतात म्हणजे ते पिकतात असं आपण म्हणू शकतो.  

ही पिकलेली फळे लहान कात्रीने कापून गोळा केली पाहिजेत फळे कापताना देठासह कापावी लागतात. कापल्यानंतर ती फळे 5 ते 6 दिवस सुकवावी हे लक्षात ठेवा, हे खुप महत्वाचे असते. बदलत्या हवामानामुळे खास करून पावसाळ्यात इलायचीचे उत्पादन हे कमीच होते. जर सूर्यप्रकाश येत नसेल तर अशा स्थितीत, कोळशाचे जाळे जाळा आणि दीड फूट उंचीवर वायरचे जाळे टाका आणि त्यावर इलायची सुकवा जेणेकरून इलायची लवकर सुकेल.

English Summary: cultivation process of elaichi Published on: 23 September 2021, 05:42 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters