कडधान्य गटातील सर्वात जास्त लोह असलेले पीक म्हणजे कुळीत अथवा हुलगाहे होय.हुलगाहे भाकरी व ज्वारीमध्ये मिसळून पीठ तयार केले जाते. त्याशिवाय भिजवून मोड आणून उसळ खाल्ली जाते तर स्वतंत्र हुलगा पिठाचे पिठले केले जाते.
या महत्त्वपूर्ण असलेल्या कडधान्य पिकांची लागवड पद्धत आणि आर्थिक महत्त्व या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊ.
- आर्थिक महत्व :-
हुलगा हे पीक आदिवासी विभागातील प्रथिनयुक्त कडधान्य आहे. भारतामध्ये जवळपास दोन दशलक्ष हेक्टरक्षेत्रावर या पिकाची लागवड केली जाते. मध्य भारत, आंध्र प्रदेश, कर्नाटक,आणि तामिळनाडू या राज्यात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा या पिकाची लागवड केली जाते. हे पीक प्रामुख्याने जनावरांसाठी आणि घोड्यांसाठी चारा पीक तसेच पशुखाद्य साठी उत्पादित केले जाते. काही प्रमाणात या पिकाची लागवड हिरवळीच्या खतांसाठी सुद्धा केली जाते.हुलग्याच्या कडधान्य मध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि काही औषधी गुणधर्म असल्यामुळे हुलग्याचे सूप अशक्त किंवा आजारी लोकांना देतात.
- जमीन व हवामान:-
या पिकाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करता येते. फक्त निट फुटलेल्या चोपण जमिनीत हे पीक येऊ शकत नाही. अत्यंत कमी पावसात सुध्दा हे पीक चांगले उत्पन्न देते.
- पूर्वमशागत :-
हुलगा हे पीक अत्यंत कणखर असल्यामुळे या पिकास फारशी पूर्वमशागत आवश्यक नाही. परंतु पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत साठवून ठेवण्यासाठी जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे.
- पेरणीचा हंगाम व वेळ :-
हुलग्याचे पिक रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामात घेतले जाते. अत्यंत कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खरीप हंगामात मान्सूनचा पहिला पाऊस झाल्याबरोबरच पेरणी करावी. रब्बी हंगामात ऑक्टोंबर महिन्यात पेरणी करून जमिनीत उर्वरित ओलाव्यावर हे पीक घेतले जाते.
- बीज प्रक्रिया :-
ह्या बियाण्यास पेरणीपूर्वी रायझोबियम प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम चोळावे.
- पेरणी :-
फुग्याचे पीक बरेच वेळा बाजरी, ज्वारी, तूर, तीळ किंवा कारळा या पिकांबरोबर आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. परंतु ज्या वेळी सलग पीक घेतले जाते. त्यावेळी हेक्टरी 40 किलो बियाणे वापरावे. हुलगे च्या बियांची आवरण खडक असल्याने रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी पेरणी केल्याने उगवण चांगली होते.
- वाण :-
तामिळनाडूमध्ये को -1, कर्नाटकामध्ये हेबल हुराळी -1हेबलहुराळी -2, या निवड पद्धतीने तयार केलेले वाणपेरणीसाठी वापरतात.
महाराष्ट्र मध्ये सिना हे फिकट पांढरे दाणे, केवडा रोगास प्रतिकारक्षम 115 ते 120 दिवसांत तयार होणारी त्याच प्रमाणे माणहा गर्द तपकिरी दाणेअसलेला 100 ते 105 दिवसात तयार होणारा वाण पेरणीसाठी वापरावा.
- खत व्यवस्थापन :-
हेक्टरी 40 किलो स्फुरद या पिकास पुरेसे होते. परंतु त्यासोबत 10 ते 15 किलो नत्र दिलेअसता चांगले उत्पन्न मिळते.
- आंतर मशागत :-
सुरुवातीच्या काळात 1 ते 2 कोळपण्या या पिकास उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात.
- काढणी :-
झाडे पिवळी पडल्यानंतर त्याचे कापणी करून दोन दिवस उन्हात सुकवूननंतर मळणी करावी.
- उत्पादन :-
सरासरी 7 ते 8 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.
Share your comments