1. कृषीपीडिया

तुळशीची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान! तीन महिन्यात होणार 3 लाखापर्यंत कमाई

तुळशी एक औषधी वनस्पती आहे जिच्या औषधी गुणधर्मामुळे तुळशीला आयुर्वेदात अनण्यसाधारण महत्व आहे. पण जर तुळशीच्या शेतीतून लाखो रूपयांचे उत्पन्न सुद्धा घेता येऊ शकते.हल्ली प्रत्येकजन आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायला बघतोय परंतु चांगली व्यवसायाची कल्पना मिळत नसल्याने व्यवसाय करू शकत नाही.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
tulsi farming

tulsi farming

तुळशी एक औषधी वनस्पती आहे जिच्या औषधी गुणधर्मामुळे तुळशीला आयुर्वेदात अनण्यसाधारण महत्व आहे. पण जर तुळशीच्या शेतीतून लाखो रूपयांचे उत्पन्न सुद्धा घेता येऊ शकते.हल्ली प्रत्येकजन आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायला बघतोय परंतु चांगली व्यवसायाची कल्पना मिळत नसल्याने व्यवसाय करू शकत नाही.

म्हणूनच आम्ही आज आपल्यासाठी अशीच एक व्यवसायाची भन्नाट कल्पना घेऊन येतोय जो की तुम्ही खुप कमी खर्चात सुरु करू शकता आणि भरघोस पैसे कमवू शकता. हा बिजनेस आहे तुळशी पीक शेतीचा. तर चला घेऊया तुळशी या पिकाची सर्व माहिती आणि जाणून घेऊया कमाईचे सर्व गणित.

 

 

 

अनेक रोगांवर कारगर सिद्ध होते तुळशी

तुळशीचे रोप अनेक आजरांवर गुणकारी आहे व तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आढळतात. तुळशीच्या शेतीतून तुम्ही काही महिन्यातच लाखोंची कमाई करू शकता. तुळशी अशी औषधी वनस्पती आहे जिचा प्रत्येक एक भाग उपयोगी असतो. तुळशीची मुळी, खोड,पाने आणि बीज सर्व भाग उपयोगी असतात.हेच कारण आहे की आज बाजारात तुळशीला खुप मागणी आहे. जसे की घरेलू उपचारपद्धतीत तुळशी अनेक प्रकारे उपयोगी पडते, तसेच आयुर्वेदिक, होमियोपॅथी,एलोपाथिक, युनानी औषधंच्या निर्मितीसाठी तुळशीचा वापर केला जातो. तुळशी आपल्या शरीरात झालेल्या वेगवेगळ्या रोगावर गुणकारी तर आहेच तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खुप उपयोगी ठरते.सोबतच तुळशी ही व्हायरल आणि बॅक्टरिया पासून होणाऱ्या इन्फेकशनवर पण उपचारासाठी मदत करते.

 

 

 

कोरोना महामारिंनंतर वाढली मागणी

धार्मिकदृष्ट्याही तुळशीचे विशेष महत्त्व आहे.त्याचबरोबर कोरोना साथीच्या आजारानंतर आयुर्वेदिक औषधांकडे लोकांचे आकर्षणही वाढले आहे.  यामुळेच आज तुळशीला बाजारात मोठी मागणी आहे.  अगरबत्तीसह अनेक धार्मिक प्रॉडक्टच्या उत्पादनात तुळशीचा वापर केला जातो.दुसरीकडे, लोकांना तुळशीचा चहा खूप आवडतो.  याशिवाय अनेक उत्पादनांमध्येही तुळशीचा वापर केला जातो.  यामुळेच तुळशीचा वापर जास्त आणि पुरवठा कमी आहे.

 

 

 

तीन लाखापर्यंत होते कमाई

तुळशीची लागवड खूप सोपी आहे.  यामध्ये खर्च आणि शारीरिक श्रम दोन्ही कमी आहेत.  कोणत्याही कंपनीशी करार करून आपण तुळशीची लागवड करू शकता.  त्याचा लागवड खर्च प्रति एकर 15 हजार रुपये आहे.  त्याचबरोबर तीन महिन्यांत सरासरी 3 लाख रुपये मिळू शकतात.  आज वैद्यनाथ, डाबर, पतंजली या कंपन्या तुळशीच्या लागवडीसाठी बाजारात करार करीत आहेत.  या कंपन्यांच्या मदतीने तुम्ही तुळशीची लागवड देखील करू शकता.  अशाप्रकारे तुम्ही तुळशी पीक लावून दरमहा 30 हजार रुपये उत्पन्न मिळवू शकता.

 

 

 

 

जुलै महिन्यात करा लागवड

तुळशी लागवडीसाठी योग्य वेळ म्हणजे जुलै महिना.  यामध्ये आपण तुळशीच्या वनस्पतींचे रोपण करू शकता.  जास्त उत्पादनासाठी तुळशीच्या चांगल्या जातींची निवड करावी.  तुळशीचे आरआरएलओसी 12 वाण 45X45 सेमी अंतरावर लावावे.  दुसरीकडे, आरआरएलओसीच्या 14 वाणांच्या लागवडीसाठी 50x50 सें.मी.  अंतर ठेवले पाहिजे.  झाडाची लागवड केल्यानंतर शेतात ओलावा नसेल तर ड्रीपने पाणी द्यावे.  दुसरीकडे, तुळशीच्या झाडांना आठवड्यातून एकदा आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.  त्याच वेळी, कृषी तज्ञ सुचवित आहेत की पिकाची कापणी होण्यापूर्वी दहा दिवस आधी पिकाला पाणी देण्याचे थांबवावे.

 

 

 

 

 

कापणीची योग्य वेळ

तूम्हाला सांगू इच्छितो की तुळशीचे पीक योग्य वेळी काढणे फार महत्वाचे आहे.  जेव्हा पाने मोठी होतील तेव्हाच त्यांची कापणी करावी.  जेव्हा तुळशीच्या बीयांची वाढ होते तेव्हा तुळशीपासून मिळणाऱ्या तेलाचे उत्पादन कमी होते म्हणून कापणी वेळेवर करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जेव्हा पाने मोठी असतात तेव्हा त्यांची काढणी करावी.कापणी 15 ते 20 सेमी उंचीपासून केले पाहिजे, ज्यामुळे नवीन शाखा सहजपणे येतात.

 

 

 

 

कुठे विकणार तुळशी?

कंत्राटी शेतीशिवाय तुम्ही तुमचे पीक मार्केट एजंटांनाही (व्यापारी )विकू शकता. जवळपासच्या बाजारात आपला माल विकण्यासाठी तुम्ही विविध व्यापाऱ्याशी संपर्क साधू शकता.  तसेच, कॉन्ट्रॅक्ट शेती करणे हा एक चांगला पर्याय आहे जेणेकरून आपल्याला पिकाची विक्री करण्यास फारसा त्रास होणार नाही.

English Summary: cultivation of tulshi Published on: 04 July 2021, 01:35 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters