हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये आपण वर्षभर कधीही लागवड करू शकतो.या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते. त्याचे नाव आहे जिरेनियम.एका एकरमध्ये 10,000 हजार रोप लागतात.आणी हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो.इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75% खर्च कमी आहे.या पिकामध्ये आंतरपिक म्हणुन शेवगा हे पिक उत्तम असते.या शेवग्याच्या उत्पादनावर
लागवडीचा खर्च निघून जातो.या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते,Oil is produced from this crop.व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते.
उन्हाळी कांदा बियाणे टाकणाऱ्या शेतकऱ्यांना आत्ताच महच्या सूचना
जिरेनियम ची शेती करताना एकरी पाच ते सहा ट्रॉली शेणखत वापरणे गरजेचे आहे. कारण जिरेनियम हे पीक तीन वर्ष आपल्या जमिनी मध्ये राहणार आहे. जिरेनियम ला रासायनिक खतांची गरज नसते. त्यामुळे आपण जेवढे शक्य होईल तेवढे शेणखत वापरणे गरजेचे आहे. जिरेनियम ची लागवड वर्षभर आपण कधीही करू शकतो. एकरी आठ ते दहा हजार रोप लागतात.
जिरेनियम पिकाची जेवढी वाढ होईल तेवढे आपले उत्पादन जास्त येते आणि त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते शेणखत. शेणखत जमिनीमध्ये मिसळून मे महिन्यामध्ये हलक्या जमिनीसाठी तीन फूट व भारी जमिनीसाठी चार फूट अंतरावर उसाच्या सरी प्रमाणे रुंद सरी काढून घ्यावी. त्यावर ड्रिप अंथरून हलक्या जमिनीमध्ये एक फुटावर व भारी जमिनीमध्ये दीड फुटावर जिरेनियम रोपांची लागवड करावी.लागवडीनंतर त्याला कोणतेही रासायनिक खत देऊ नये. जिरेनियम ची लागवड ही जून
महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. त्यामुळे रोप व्यवस्थित सेट होते. त्यानंतर पहिल्या कटिंग ची वेळ ही ऑक्टोबर महिन्यामध्ये येते. कटिंग झाल्यानंतर व बुरशीनाशकांची फवारणी करून जमिनीमध्ये जिवाणूजन्य बुर्शिनाशक सोडावे. त्यानंतर प्रत्येकी तीन महिन्यांनी आपल्याला कटिंग करता येते.वर्षभरामध्ये कोण कोणती खते व औषधांचा वापर करायचा आहे ते आपल्याला ज्यांच्याकडून प्लांट मिळतात त्यांच्याकडून माहिती मिळते. जिरेनियममध्ये कोणत्याही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
Share your comments