MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

या पद्धतीने करा खपली गहु लागवड, होईल मोठा फायदा

हरितक्रांतीनंतर आलेल्या गव्हाच्या बागायती, बुटक्या

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
या पद्धतीने करा खपली गहु लागवड, होईल मोठा फायदा

या पद्धतीने करा खपली गहु लागवड, होईल मोठा फायदा

हरितक्रांतीनंतर आलेल्या गव्हाच्या बागायती, बुटक्या व अधिक उत्पन्न देणार्‍या वाणांनी आपल्याकडील परंपरागत खपली व बन्सी (शेतगहू) वाणांना हटविले. हे देशी वाण काळाच्या ओघात शेतकर्‍याच्या शेतावरून अदृश्य झाले. हे वाण जरी उत्पन्नाला कमी होते, काही वाण तांबेरा रोगाला बळी पडत होते तरी हे आहारासाठी कसदार होते. त्यात उच्च दर्जाची पोषणमूल्ये होती. त्यामुळेच की काय, त्या वेळेस मधुमेहासारखे आजार फारसे माहीत नव्हते. सध्या गहू उत्पादनामध्ये आपण स्वयंपूर्ण बनलो आहोत व राखीव साठेसुद्धा ओसंडून वाहत आहेत. तेव्हा,

आता आरोग्यासाठी परिपूर्ण पोषणतत्त्वे असणार्‍या जुन्या जातीकडे सर्वांचे लक्ष जात आहे.Now all the attention is turning to the old varieties which have perfect nutritional values ​​for health.खपली गव्हाखाली सध्या मर्यादित क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील सांगली,

पुरस्कार प्राप्त मोसंबी उत्पादक बागायतदाराचे 'हाड-मास व मासोळी खत' संदर्भातील उस्फूर्त मनोगत

कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यांत तसेच दक्षिण महाराष्ट्राला लागून असणार्‍या कर्नाटकाच्या धारवाड, बेळगाव, विजापूर व गुलबर्गा जिल्ह्यांमध्ये याची लागवड केली जाते.खपलीचा उत्कृष्ट प्रतीचा रवा बनतो. शिरा, उपमा यांसारख्या भारतीय पदार्थांत याचा उपयोग केला जातो. तसेच चांगल्या प्रतीचा पास्ता व इतर उपपदार्थांसाठी याचा वापर सर्वोत्तम ठरतो. सरबती

गव्हापेक्षा हा पास्ता यामधील असणार्‍या गुणामुळे उच्च प्रतीचा असतो. त्याची किंमतही जास्त असते.इतर बागायती गव्हाप्रमाणे खपली काळ्या व कसदार जमिनीत चांगली येते, परंतु हलक्या व चोपण जमिनीमध्येसुद्धा समाधानकारक उत्पन्न देते. उशिरा पेरणीसाठी खपलीचा वापर करतात, कारण ती उष्णता व निकस जमिनीचा ताण सहन करू शकते. याचबरोबर खपलीमध्ये तांबेरा रोगप्रतिरोधक गुणधर्म आहेत. तसेच निसर्गत:च खपलीमध्ये कणखरपणा आहे. खपली गव्हामध्ये 12 ते 15 % प्रथिने असतात. याशिवाय 78 ते 83 % कर्बोदके असतात. अत्यंत

महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तंतूंचे (Dietary Fibers) प्रमाण 16% आहे जे इतर गव्हांत नाही. या गुणधर्मामुळे खपली मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कॅन्सर, बद्धकोष्ठता इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे. धारवाड कृषी विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासानुसार खपलीचा आहारात वापर केल्यामुळे मधुमेही रुग्णांच्या Total lipid, Triglycerides and LDL Cholesterol मध्ये लक्षणीय घट झाली. म्हणजेच या आजारातील धोका बर्‍यापैकी कमी झाला. याशिवाय परदेशात केलेल्या अशाच संशोधनात Type 2 मधुमेह व वयानुसार कमी

होणार्‍या दृष्टिर्‍हासात खपलीचा आहारातील उपयोग चांगला दिसून आला. खेळाडूंच्या दैनंदिन आहारातील खपलीचा उपयोग क्षमता टिकवून धरण्यासाठी उपयोगी पडतो.अशी ही गुणवंत खपली ‘सोने जैसा गेहू’च्या जाहिरातबाजीत, उत्पन्नाच्या चढाओढीत काळाच्या मागे पडली; परंतु आता शहरीकरणातील बैठ्या जीवनशैलीमुळे मधुमेह, हृदयविकार अशा आजारांमुळे तिच्यातील पौष्टिक गुणधर्माकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. प्रक्रिया उद्योगामध्ये खपलीची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढली आहे.पूर्वापार लागवडीत असलेले खपलीचे वाण हे उंच

वाढणारे आहेत. पाणी जास्त झाले तर ते लोळतात व काढणीस उशीर झाला तर ओंब्या खाली तुटून पडत नाहीत. शिवाय उत्पादकताही एकरी 20 ते 25 क्विंटल एवढी आहे.खपली वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :1. उंची 80 ते 90 सें.मी. लोळत नाही.2. 110 ते 115 दिवसांत काढणीसाठी तयार होते.3. तांबडा व लांबसडक दाणा4. 1000 दाण्यांचे वजन 41 ग्रॅम5. प्रथिने 13.5%6. सरासरी उत्पन्न 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर व कमाल उत्पन्न 62 क्विंटल प्रति हेक्टर.बियाणे : 35-40 किलो प्रति एकरी पेरणीसाठी. टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी 20 ते 25किलो बियाणे पुरेसे आहे.पेरणी : 23 सें.मी. अंतरावर पाभरीने एकेरी

करावी. पेरणीसाठी हरभरा अथवा भुईमुगाचे चाडे वापरावे.पाण्याचे व्यवस्थापन : आवश्यकतेनुसार पीकाला पाण्याच्या पाच पाळ्या द्याव्यात. शेवटची पाळी पीक पक्व झाल्यावर देऊ नये, अन्यथा पीक लोळण्याची आणि दाणा पांढरा पडण्याची शक्यता असते.काढणी व मळणी : ओंब्या अगर पाकळ्या गळू नयेत म्हणून योग्य वेळेत काढणी करावी. कापणी शक्यतो सकाळी करावी. दुपारी ओंब्या गळण्याची शक्यता जास्त असते. पेंड्या एक दिवस वाळवून थ्रशरने मळणी करावी. Combine Harvester नेही काढणी करता येते; परंतु त्यासाठी मशिन हळू चालवावे, गती कमी ठेवावी. त्याचबरोबर चाळणीतून मागे खपली पडत नाही ना, खपलीचे तुकडे होत नाहीत ना याची दक्षता घ्यावी.

English Summary: Cultivation of Khapli wheat in this way will be of great benefit Published on: 01 November 2022, 03:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters