1. कृषीपीडिया

Aloe Vera Cultivation: कमी पैशात करा कोरफडची शेती आणि कमवा लाखों रुपये

शेती म्हणजे तोट्याचा सौदा असेच समजले जाते, परंतु जर शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली आणि पीक पद्धतीत मोठा आमूलाग्र बदल केला तर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते. देशातील अनेक शेतकरी बांधव पीकपद्धतीत मोठा अमुलाग्र बदल करीत आहेत, मात्र असे असले तरी अद्यापही अनेक शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीनेच शेती करत असल्याचे बघायला मिळत आहे. कृषी तज्ञांच्या मते, पारंपारिक पीकपद्धतीला बगल देत जर नगदी पिकांची लागवड केली तर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते. आज आपण एलोवेरा अर्थात कोरफड लागवड विषयी जाणून घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
aloe vera farming

aloe vera farming

शेती म्हणजे तोट्याचा सौदा असेच समजले जाते, परंतु जर शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली आणि पीक पद्धतीत मोठा आमूलाग्र बदल केला तर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते. देशातील अनेक शेतकरी बांधव पीकपद्धतीत मोठा अमुलाग्र बदल करीत आहेत, मात्र असे असले तरी अद्यापही अनेक शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीनेच शेती करत असल्याचे बघायला मिळत आहे. कृषी तज्ञांच्या मते, पारंपारिक पीकपद्धतीला बगल देत जर नगदी पिकांची लागवड केली तर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते. आज आपण एलोवेरा अर्थात कोरफड लागवड विषयी जाणून घेणार आहोत.

मित्रांनी एलोवेरा ची मागणी देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. एलोवेरा चा उपयोग कॉस्मेटिक इंडस्ट्रीपासून तर आयुर्वेदिक औषध बनवण्यापर्यंत सर्वच ठिकाणी केला जातो. म्हणूनच याची मागणी बारामाही बाजारपेठेत असते, याची शेती करणारे शेतकरी बांधव म्हणूनच चांगला नफा कमवत असतात. शेतकरी मित्रांनो आपण देखील एलोवेरा लागवड करून चांगले मोठी कमाई करू शकता. याच्या शेती मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची लागवड पाच वर्षातून केवळ एकदा करावी लागते अर्थात याची लागवड केल्यानंतर सलग पाच वर्षे उत्पादन मिळवता येऊ शकते.

हेही वाचा:-‘या’ फळाची लागवड करा आणि कमवा लाखो! बाजारात सदैव मागणी म्हणून कमाई होणार बम्पर; जाणुन घ्या याविषयी सविस्तर

एकदा याची लागवड केली याच्या झाडातून प्राप्त होणारे बेबी प्लांट आपण दुसऱ्या शेतात लावून एलोवेराची शेती वाढवू शकता. असे सांगितले जाते की, एक एलोवेराचे झाड चार महिन्यानंतर बेबी प्लांट उत्पादित करण्यासाठी तयार होते. याची मागणी औषध तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये तसेच कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आपण या कंपन्यांशी करार करून किंवा डायरेक्ट देखील एलोवेरा विकू शकता.

कोरफडच्या देश-विदेशात अनेक प्रजाती बघायला मिळतात, या असंख्य प्रजातीपैकी इंडिगो ही प्रजाती सर्वात जास्त आढळते. ही प्रजाती सामान्यतः आपल्या घरांमध्ये आढळते.  पण असं असलं तरी कोरफडीची बार्बाडेन्सिस ही प्रजाती एलोवेराची मोठ्या प्रमाणात शेती करण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. शेतकरी बार्बाडेन्सिस प्रजातीची लागवड करण्यास अधिक प्राधान्य देतात, कारण की या जातीची पाने मोठी असतात आणि त्यातून जास्त एलोवेरा जेल निघते.

शेतकरी मित्रांनो आपण जर एक एकर क्षेत्रात कोरफड अर्थात एलोवेरा लागवड केली तर आपणास यातून दरवर्षी सुमारे 20 हजार किलो कोरफडचे उत्पादन मिळणे अपेक्षित असते. कोरफडची ताजी पाने विकल्यास त्याची किंमत 5 ते 6 रुपये किलो आहे. शेतकरी मित्रांनो आपण एका बिघा शेतात 12 हजार कोरफडीची रोपे लावू शकतात, आणि एक बिघा शेतात कोरफडीची लागवड करण्यासाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च येईल.

हेही वाचा:- Mushroom Farming! फक्त 6×6 मध्ये करा मशरूमची शेती आणि मिळवा बक्कळ नफा

कोरफडीच्या एका रोपापासून 3.5 किलोपर्यंत कोरफडची पाने मिळतात आणि एका पानाची किंमत 5 ते 6 रुपयांपर्यंत असते. म्हणजेच एका झाडाची पाने सरासरी 18 रुपयांपर्यंत विकली जाऊ शकतात असा अंदाज आहे. एकंदरीत 40 हजार रुपयांची गुंतवणूक करून शेतकरी बांधव अडीच लाख रुपयांपर्यंत कमाई सहजरित्या करू शकतात. यानुसार कोरफड लागवड करून सुमारे पाच पट अधिक नफा प्राप्त केला जाऊ शकतो.

कोरफडची जर लागवड करायची असेल तर याची लागवड फेब्रुवारी ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत करता येणे शक्य असते. हिवाळ्यात याची लागवड करू नये असा सल्ला दिला जातो. याची लागवड करताना दोन रोपांमध्ये 2 फूट अंतर असायला हव त्यामुळे यापासून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. याच्या रोपाची लागवड केल्यानंतर, शेतकरी वर्षातून दोनदा त्याची पाने काढू शकतात आणि चांगला नफा मिळवू शकतात.

English Summary: Cultivate aloe vera for less money and earn lakhs of rupees Published on: 13 March 2022, 01:23 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters