1. कृषीपीडिया

‘या’ फळाची लागवड करा आणि कमवा लाखो! बाजारात सदैव मागणी म्हणून कमाई होणार बम्पर; जाणुन घ्या याविषयी सविस्तर

देशात अलीकडे शेतकरी बांधव पारंपारिक शेतीला फाटा देत वेगवेगळ्या नगदी तसेच फळबाग पिकांची लागवड करीत आहेत. शेतकरी बांधवांना यातून चांगला मोठा नफा देखील प्राप्त होत आहे. देशात सध्या किवी फ्रुट ची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. किवी हे एक विदेशी फळ आहे मात्र याची देशातील बाजारपेठेत मागणी वधारली आहे, त्यामुळे किवी फ्रूट ची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहे. किवी फ्रूट मानवी शरीरासाठी देखील अतिशय फायदेशीर असल्याचे सांगितलेhttps://marathi.krishijagran.com/umbraco/#tab32 जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
kivi farming

kivi farming

देशात अलीकडे शेतकरी बांधव पारंपारिक शेतीला फाटा देत वेगवेगळ्या नगदी तसेच फळबाग पिकांची लागवड करीत आहेत. शेतकरी बांधवांना यातून चांगला मोठा नफा देखील प्राप्त होत आहे. देशात सध्या किवी फ्रुट ची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. किवी हे एक विदेशी फळ आहे मात्र याची देशातील बाजारपेठेत मागणी वधारली आहे, त्यामुळे किवी फ्रूट ची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहे. किवी फ्रूट मानवी शरीरासाठी देखील अतिशय फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

यामध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगतात. कृषी वैज्ञानिकांच्या मते किवी फ्रुट ची लागवड भारतात देखील केली जाऊ शकते, याची लागवड साधारणतः जानेवारी महिन्यात केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. किवी फ्रूट स्पेन फ्रान्स चिली जापान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इटली अमेरिका आणि चीन या देशात मोठ्या प्रमाणात नजरेस पडते. किवी फ्रूट मध्ये विटामिन बी आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळते तसेच यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर कोपर सोडियम इत्यादी पोषकतत्वे आढळतात.त्यामुळे त्याचे सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामुळे याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे म्हणुन आज आपण किवी फ्रुटच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत.

किवी फ्रूट साठी उपयुक्त जमीन- किवी फ्रुट ची लागवड पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करण्याची शिफारस केली जाते. याची लागवड सुपीक, भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या, वाळूमिश्रित चिकन माती असलेल्या जमिनीत केल्यास यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होते. किवी फ्रुट ची लागवड अशा जमिनीत करावी जिथे 7.3 पेक्षा कमी पीएच असतो. किवी फ्रुट ची लागवड अशा जमिनीत करू नये ज्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. तसेच ज्या जमिनीत पावसाळ्याचे पाणी साचते त्या जमिनीत देखील किवी फ्रुट ची लागवड केली जाऊ शकत नाही.

किवी फ्रुट ची लागवड- किवी फ्रुट चे रोपटे ते रोपटे अंतर 18 फूट असले पाहिजे, तसेच लाईन ते लाईन अंतर बारा फूट च्या दरम्यान असले पाहिजे. किवी फ्रूट एक वेलवर्गीय झाड असते. याच्या लागवडीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किवी फ्रूटचे नर आणि मादा असे दोन्ही प्रकारचे झाड लावावे लागतात. नऊ मादा झाडांमागे एक नर किवी फ्रुट चे झाड लावावे लागते. शेतकरी मित्रांनो जर आपणास एक हेक्टर क्षेत्रात किविफ्रूटची लागवड करायची असेल तर आपणास सुमारे चारशे पंधरा किती ग्रुपचे झाडे लावावी लागतील.

किवी फ्रूट साठी पाणी व्यवस्थापन- किवी फ्रुट लागवडीत पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. किवी फ्रूट ला उन्हाळी हंगामात जास्त पाणी लागते. उन्हाळ्यात दर पंधरवड्याला किविफ्रूट ला पाणी द्यावे लागते. किवी फ्रूट च्या लागवडीत जर योग्य पाणी व्यवस्थापन केले केले तरी आतून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते.

English Summary: start kivi farming and earn il millions do you know how to cultivate it if no then read this Published on: 12 March 2022, 05:26 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters