हरितद्रव्य लोप पावणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण असून,पानांच्या शिरातील हरितद्रव्य नष्ट झाल्याने शिरातील उतींचा ऱ्हास होऊन त्या मृत पावतात. उतींचा ऱ्हास झाल्याने पानांवर पिवळसर सोनेरी रेषा किंवा अनियमित चट्टे दिसून येतात. पोंगा व पोंग्याजवळचे पान कुजते. झाडाची वाढ खुंटून कालांतराने झाड मरते. या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदामार्फत तर दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो.
व्यवस्थापन - विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी रासायनिक उपाय नसल्याने त्यांचा प्रसार रोखणे, तसेच त्यांच्यापासून होणाऱ्या नुकसानाची पातळी नियंत्रणात राहील याबाबत योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.विषाणूजन्य रोगांचा प्राथमिक प्रसार प्रामुख्याने कंदामार्फत होत असल्याने लागवडीसाठी निरोगी बागेतील कंद निवडावेत.
उतिसंवर्धित रोपांपासून लागवड करताना नोंदणीकृत उतिसंवर्धन प्रयोगशाळेतून विषाणू निर्देशांक तपासलेली, निरोगी व जोमदार रोपे खरेदी करावीत.रोपनिर्मितीसाठी स्वतंत्र मातृबाग असणे आवश्यक आहे.A separate mother garden is required for plant production.परप्रांतातून केळीचे कंद किंवा रोपे आणू नयेत, यासाठी संसर्गरोग उपायांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.रोगाची लक्षणे दिसताच रोगट झाडे कंदासकट उपटून नष्ट करावी.
बाग तसेच बांधावरील सर्व प्रकारचे तण काढून स्वच्छता ठेवावी.बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका लागवड करू नये.बागेभोवतीचे रान कारली, शेंदणी, करटुले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत.मावा किडीच्या नियंत्रणासाठी, डायमिथोएट (३० ईसी) २ मि.लि. किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Share your comments