भाजीपाला पिकांमधील टोमॅटो हे एक महत्त्वपूर्ण भाजीपाला पीक असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड करतात. कारण इतर पिके आणि फळपिके यांच्या तुलनेने जर आपण भाजीपाला पिकांचा विचार केला तर बाजारपेठेत चांगला दर मिळाला तर कमी खर्चात आणि कमी कालावधीमध्ये खूप चांगला आर्थिक नफा देण्याची ताकत या पिकांमध्ये असते. जर आपण टोमॅटो शेतीचा विचार केला तर एकंदरीत टोमॅटो लागवड इतर भाजीपाला पिकांपेक्षा जास्त खर्चिक असते.
कारण टोमॅटोची लागवडीपासून म्हणजेच रोपे आणण्यापासून खर्च करावा लागतो तर त्याला आधार देण्यासाठी जे काही तार आणि सुतळीच्या साह्याने जी काही व्यवस्था करावी लागते त्याला देखील भरपूर प्रमाणात खर्च येतो. परंतु तरी देखील बऱ्याच शेतकऱ्यांना वातावरण वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या असताना देखील चांगले उत्पादन हातात येत नाही.
नक्की वाचा:News: हळद पिकाला बसत आहे कंदमाशीचा मोठा फटका, अशा पद्धतीने करा व्यवस्थापन तरच होईल फायदा
त्यामागे काही वेळेस व्यवस्थापनातील त्रुटी असतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपण टोमॅटोच्या जातीची लागवड केलेली असते तिच्या निवडीमध्ये झालेली चूक होय.
कारण जर आपण टोमॅटोची जातीची निवड करताना ती जर दर्जेदार व चांगल्या पद्धतीने केली नाही तर तिचा नक्कीच फटका उत्पादनाला बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या चांगल्या संकरित जातीची निवड करणे गरजेचे आहे.
जेणेकरून केलेले कष्ट आणि खर्च वाया न जाता त्याचा व्यवस्थित मोबदला मिळेल. त्यामुळे आपण अशाच एका शेतकऱ्यांना चांगले टोमॅटोचे उत्पादन देऊ शकेल अशा महत्त्वपूर्ण संकरित जातीची माहिती या लेखात घेणार आहोत.
नक्की वाचा:Crop Tips: टोमॅटोपासून हवे भरपूर उत्पादन तर वापरा 'या' टिप्स, मिळेल भरपूर उत्पादन आणि नफा
शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशी टोमॅटोच्या संकरित जात सीटीएच-1
जर आपण टोमॅटोच्या या संकरित जातीचा विचार केला तर हे चांगले आणि अधिक उत्पादनासाठी लोकप्रिय असून टोमॅटोची संकरित जात कोइमतूर येथील टीएनयु यांनी सन 2019 मध्ये हे विकसित केली आहे.
या जातीपासून मिळणारे जे काही टोमॅटोचे फळ असते ते आकाराने एकदम गोलाकार असते व व्यवस्थित टेंपरेचर मेंटेन करुन हे दहा दिवस आरामात टिकाव धरू शकते.
जर आपण या जातीचा विचार केला तर या जातीच्या लागवडीतून एका हेक्टर मधून 900 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्यास ही जात सक्षम आहे.
परंतु जर आपण पेरणीसाठी या जातीच्या बियाण्याचा वापर केला तर एका हेक्टर क्षेत्रासाठी कमीत कमी 400 ग्रॅम बियाण्याची गरज असल्याचे सांगितले जाते.
या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जर या जातीची लागवड करायची असेल तर तुम्ही खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात करू शकतात.या जातीची लागवड महाराष्ट्रात करणे शक्य असून त्यासोबतच मध्य प्रदेश,राजस्थान, कर्नाटक, हरियाणा आणि दिल्ली व इतर राज्यांमध्ये देखील या जातीच्या टोमॅटोची लागवड करता येते.
नक्की वाचा:Wheat farming: गहू लागवडीअगोदर बियाणे दर्जेदार आहे की नाही, अशाप्रकारे चुटकीसरशी ओळखा
Share your comments