कालच्या लेखामध्ये आपण पिकांमधील मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता व त्यांचा अतिरेक यामुळे होणारे परिणाम पाहिले. या लेखात आपण काही महत्त्वाचे दुय्यम अन्नद्रव्याची पिकांसाठी असलेली उपयुक्तता आणि त्यांचे कमतरतेची लक्षणे,तसेच या दुय्यम अन्नद्रव्यांचा अतिरेकी वापर त्यामुळे पिकांवर होणारा परिणाम याबद्दल जाणून घेणार आहोत.
दुय्यम अन्नद्रव्य
- लोह – लोह हरितद्रव्य तयार होण्यासाठी फारच उपयुक्त आहे. लोहा मुळे झाडामध्ये विविध संप्रेरके तयार होतात.
पिकांमधील लोहाच्या कमतरतेची लक्षणे
- पिकांमध्ये जर लोहाची कमतरता असेल तर सुरुवातीला कोवळी पाने शिरा वगळता पिवळी पडतात. लोहाची कमतरता जास्त असेल तर पूर्ण पान पांढरे पडते.
जास्त लोहाचा वापर केल्याची लक्षणे
- पिकांच्या पानांवरती लहान स्वरूपातील तपकिरी ठिपके आढळतात.
- मॅगेनीज– कार्य= बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी मॅगनीज उपयुक्त आहे. तसेच पिकांच्या पक्वतेची गती वाढवते. तसेच झाडांना नत्र उपलब्ध करून देण्यास सहाय्यभूत ठरते.
पिकांमधील मॅगनीज च्या कमतरतेची लक्षणे
- ओट पिकाचा विचार केला तर यामध्ये पीक तपकिरी होते. रुंद पानांच्या पिकांमध्ये पिवळे पना आढळतो वाटाणा च्या शेंगांवर चिखल्यासारखे ठिपके आढळतात.गहू पिकामध्ये मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
मॅगनीजच्या अतिरेकी वापराचे लक्षणे
- मॅगनीज चा जास्त वापर केला तर पीक तजेलदार वाटत नाही तसेच वाढदेखील थांबते.
3-झिंक– झिंक प्रथिने, संप्रेरके व त्याचबरोबर वाढीसाठी गरजेचे रसायने निर्माण करण्यास मदत करते.
झिंकच्या कमतरतेची लक्षणे
झिंक प्रामुख्याने मका, संत्री,भात,कांदा,सोयाबीन इत्यादी पिकांना फार गरजेचे असते. मका आणि ज्वारी पिकात फुलोरा पांढरा सापडणे, कापसामध्ये कमतरता राहिली तर कापसाच्या झाडाचे पान बारीक राहते.इत्यादी लक्षणे आढळतात.
झिंक च्या अतिरेकाचे लक्षणे
पिकांची मर होते. पिके पिवळी पडतात व लोह शोषण यात अडचणी येतात.
- तांबे – तांबे हे पिकांमध्ये हरित द्रव्य निर्मितीमध्ये उपयुक्त आहे. पिकांमध्ये विविध संप्रेरकनात्यांचेकार्य करण्यात मदत करते.
पिकांमधील तांब्याच्या कमतरतेची लक्षणे
मका पिकामध्ये नवीन पाने पिवळी पडतात तसेच झाड बूटके राहते. तसेच पानाच्या कडा वाळतात.
तांब्याच्या अतिरेकी वापराचे लक्षणे
पिकांमध्ये जर जास्त तांब्याचा अतिरेक झाला तर जाड गर्द रंगाचे दिसते आणि मुळांची वाढ गरजेपेक्षा जास्त जाड होते.
बोरॉन– याच्या वापराने झाडाचे आरोग्य राखले जाते. कपाशी सारख्या पिकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पातेगळ रोखण्यास मदत करते. तसेच जमिनीतील पाणी शोषण्याचा कामी झाडांची मुळाना मदत करते.
कमतरतेची लक्षणे
बोरॉनची कमतरता असेल तर पिकांची पाने जाड होतात. तसेच ते सुकतात व चूरडतात. तसेच पिकाच्या आणि फळांच्या देठाजवळ पाणीदार पट्टे आढळतात.
बोरॉनच्या अधिक वापराचे लक्षणे
बोररॉनच्याअधिक वापरा मुळे सुरुवातीला पानाचे टोक व नंतर पूर्ण पानच पिवळे पडते.
क्लोरीन – क्लोरीन पिकांना प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत मदत करणे.
क्लोरीनचा कमतरतेची लक्षणे
झाड तात्पुरते वाळल्यासारखे वाटते. नवीन कोळी पाणी पिवळी पडतात अधिक प्रमाणात कमतरता असेल तर झाड पूर्णपणे वाळते.
क्लोरीनचा जास्त वापर केला तर दिसणारी लक्षणे
तंबाखू आणि बटाट्यासारखे पिकांमध्ये जर क्लोरीन च्या जास्त वापर केला तर या पिकांचे पानेजाड होतातव वळतात. त्याच बरोबर अधिक क्लोरीनचे वापरामुळे बटाट्याची साठवून जास्त कालावधीसाठी करता येत नाही.
Share your comments