येणाऱ्या काळामध्ये सोलर वाटर पंपाचा वापर वाढेल. तसेच मार्केटमध्ये सोलर वॉटर पंप तयार करणाऱ्या कंपनी आहे काही दिवसात मोठ्या प्रमाणात उतरतील. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे डिझेलच्या वाढत्या किमती तसेच विजेच्या सततचा लपंडाव या समस्यांमुळे शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून सोलार वॉटर पंप फायद्याचे ठरतील.
सोलार वॉटर पंप वापरासाठी केंद्र सरकारकडून पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोलर वॉटर पंपाचा व्यवसाय आणि वापर वाढेल यात शंका नाही. भारताला सौर ऊर्जेच्या बाबतीत उपयुक्त मानले जाते. कारण भारतात उष्णता चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. यामुळे येथील शेतकरीसोलर पॅनल ला कृषी पंप जोडून शेतातील आपली पाण्याची गरज भागवू शकता. या क्षेत्रामध्ये बऱ्याच कंपन्या उतरल्या आहेत त्यामधील बड्या कंपन्यांचे लक्ष आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करणे हे होय. मार्केटमध्ये जास्त कंपन्या प्रतिस्पर्धी म्हणून उतरल्याने येणाऱ्या काळामध्ये सोलर कंपनीच्या किमतीमध्ये घसरण होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो.
1 ते 100 एचपी चे पंप
शेती क्षेत्रातील अग्रगण्य असलेली किर्लोस्कर कंपनी सोलर पॅनल चा वॉटर पंप बनवीत आहे. या सगळ्यां सिस्टीम मध्ये एक सोलर पॅनल असतो. ज्यावर सूर्याचे प्रकाश पडल्याने हे ऊर्जा डी सी मध्ये परावर्तित होते. या डी सि ला कंट्रोलच्या सहाय्याने एसी मध्ये परावर्तित केले जाते त्यामुळे वॉटर पंप चालवणे सुलभ होते. किर्लोस्कर कंपनीने एक एचपी पासून ते 100 एचपी पर्यंत कृषी पंप बनवण्याचे लक्ष ठेवले आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की, आपल्या बोरवेल च्या मर्यादेनुसार सोलार वॉटर पंप निवडावा तसेच या पंपाच्या साहाय्याने किती अंतरापर्यंत पाणी घ्यायचे आहे याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
सोलर वॉटर पंपची किंमत
कंपनीकडून सोलर पॅनल सहित वाटर मोटर चा सगळा संच दिला जातो. यासाठी किरलोस्कर कंपनीचा 1 एचपी च्या पंपाची किंमत दीड लाख रुपये पर्यंत आहे. यामध्ये सोलर पॅनल, मोटर, पंप आणि इंस्टॉलेशन हा सगळा खर्च समाविष्ट आहे. तसेच 3 एचपी पंपाची किंमत अडीच लाख रुपये आहे, तसेच 2 एचपी च्या पंपाची किंमत एक लाख 80 हजार रुपये आहे. 10 एचपी पंपाची किंमत सहा लाख रुपये आहे.
सरकारी अनुदान
शेतकऱ्यांसाठी या किमती फार जास्त आहेत. यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणूनसरकारकडून सबसिडी दिली जाते. अगोदर शेतकऱ्यांना सोलर मोटर वर सबसिडी मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते. परंतु यामध्ये ज्या संख्येत शेतकरी रजिस्ट्रेशन करतात त्या सगळ्यांना सबसिडी मिळत नाही. यामध्ये लकी ड्रॉ काढून सबसिडी वाटली जाते.
दहा तास चालते ही मोटर
एक सोलर वॉटर पंप दिवसभरात सहा ते दहा तास चालतो. जर प्रखर उष्णता असेल तर हा कालावधी वाढवू शकतो. जर डिझेलचा आणि विजेचा हिशोबाने पाहिले तर सोलर पंप एकदम स्वस्त साधन आहे. जर अनुदानावर सोलर वॉटर पंप मिळाला तर मोटारीसाठी पाच वर्षाची आणि सोलर पॅनल साठी 25 वर्षाची वारंटी मिळते. जर विनाअनुदानित सोलर वॉटर पंप मिळाला तर मोटारीसाठी दीड वर्ष आणि सोलर पॅनल साठी पंधरा वर्षाची वारंटी मिळते. सोलर मोटर ची वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये एक स्विचप्लग असतो त्याच्या साह्याने तुम्ही विजेवर देखील हा पंप चालू शकतात.
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच पीएम कुसुम योजना च्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार सोलर पंप सब्सिडी देते. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेसाठी सरकारकडून टेंडर काढले जातात. या योजनेच्या माध्यमातून 2019 या वर्षात जवळजवळ पन्नास हजार सोलर वॉटर पंप बसवले गेले. सन 2020 आणि 21 मध्ये हे लक्ष एक लाखापर्यंत करण्यात करण्यात आले आहे.
Share your comments