मका हे भारतातील सर्वात महत्त्वाचे पीक असून हे गहू आणि तांदूळ नंतर तिसऱ्या नंबरची महत्त्वाचे पीक आहे.
मक्याचे मागणी दिवसेंदिवस वाढत असून एकूण मका उत्पादनापैकी जवळजवळ 55 टक्के मक्याची गरज हे फक्त पोल्ट्री उद्योगाला असते. जर आपण मागील आठ वर्षाचा विचार केला तर मक्याच्या एम एस पीत जवळजवळ चाळीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी देखील म्हटले आहे. मक्याचा वापर हा औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येतो जसे की इथेनॉल उत्पादनासह इतर क्षेत्रात देखील मक्याच्या वापरा सोबत या पिकाची लोकप्रियता संपूर्ण जगात झपाट्याने वाढत आहे. कुकुट पालन व्यवसायाचा डोलारा मका पिकावर अवलंबून आहे. पिकांच्या विविधीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार विविध प्रयत्नांद्वारे शेतकऱ्यांना मका पिकाची लागवड करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी हे पीक खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते. FCCI द्वारे आयोजित इंडिया मक्का समित 2022 च्या आठव्या आवृत्तीला संबोधित करताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मका लागवड क्षेत्राला चालना मिळण्यासाठी सरकारच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन देखील दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शेती देशाचा कणा असून कोविड मध्ये सुद्धा देशाला कृषी क्षेत्राने खूप मदत केली आहे. कृषी उत्पादनांच्या निर्यातीतही उत्साहवर्धक वाढ झाली असून त्याचा आकडा सुमारे चार लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
पीक विविधतेत मका पिकाची भूमिका
यावेळी नरेंद्र सिंग तोमर म्हणाले की, आजच्या काळात उद्योग आणि शेतकऱ्यांना एकत्र काम करावे लागेल व त्या माध्यमातून दोघांच्या गरजा भागविता येतील. त्यामुळे शेती व शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होण्यास मदत होईल.FCCI चे राष्ट्रीय कृषी समितीचे अध्यक्ष आणि टाफेचे समूह अध्यक्ष टीआर केशवन यावेळी सांगितले की, अन्न आणि पोषण सुरक्षेच्यादृष्टीने मक्यामध्ये चांगली क्षमता आहे. पीक विविध करण्याच्या बाबतीत देखील ते योग्य मार्ग दाखवते. ज्या भागातील शेतकरी पूर्णतः पावसावर अवलंबून आहेत आणि अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी हे पीक खूप उपयुक्त ठरले आहे.
हे जागतिक पातळीवरील महत्त्वाचे पीक असून बहुतेक विकसनशील देशांना अन्नसुरक्षा प्रदान करण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका निभावते. गहू आणि तांदूळ नंतर भारतातील तिसरे महत्त्वाचे पीक म्हणून मका पिकाचा विकास होत आहे. जर भारतातील एकूण मका उत्पादनाचा विचार केला तर यामध्ये बिहार राज्याचा वाटा नऊ टक्के आहे. कुक्कुटपालन क्षेत्रातील मक्याच्या वाढत्या मागणीचा फायदा भारतीय मकाच्या शेतीला नक्कीच भविष्यात होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
Share your comments