1. कृषीपीडिया

शेणखत तयार करण्याची हे अप्रतिम पध्दत, जाणून घ्या

अनेक शेतकरी बांधव शेतात शेणखत टाकत असले तरी ते चांगल्या प्रकारे कुजलेले नसते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेणखत तयार करण्याची पध्दत, जाणून घ्या

शेणखत तयार करण्याची पध्दत, जाणून घ्या

अनेक शेतकरी बांधव शेतात शेणखत टाकत असले तरी ते चांगल्या प्रकारे कुजलेले नसते . अनेक शेतकरी बांधवांचे शेणाचे खडडे ४ - ५ फूट खोल असतात त्यामुळे अडीच फूट पेक्षा जास्त खोल असणारे खड्ड्यात शेणखत कुजवणारे जिवाणू काम करीत नाही . आणि ४ . ते ५ फूट खोल खड्ड्यात शेणखत कुजविण्यासाठी किमान ४ प्रकारचे जिवाणू आवश्यक आहेत . त्यामध्ये एरोबीक आणि अन एरोबीक तिसरा लिग्नो लेटीक आणि सेल्यूलेटीक अशा चार प्रकारच्या जिवाणूंची आवश्यकता असते . त्यामुळे अडीच फुटाच्या वर शेणाचा खड्डा खोल नसावा . त्याच बरोबर शेण खताचे ढिगार जमीनीवर पण नसावेत त्यामुळे शेणखत तयार होत नाही . झाले तरी अर्धवट कुजलेले तयार होते . आणि तशा प्रकारचे शेणखत शेता मध्ये टाकल्यास हुमनी अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो . पर्यायाने शेती फायद्याची होण्या ऐवजी तोट्यात जाते . त्यावर खर्च मोठ्या प्रमाणावर होतो . अजून दुसरी महत्वाची बाब म्हणजे शेणखत टाकताना कोरड्या जमीनीवर फेकू नये जमीनीची नागंरणी केल्याबरोबर त्वरीत टाकून त्यामागे डवरणी करणे गरजेचे आहे .

एक टन शेणखतापासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण :-

1) नत्र - 5.6 किलो

2) स्फुरद - 3.5 किलो

3) पालाश - 7.8 किलो 

4) गंधक - 1 किलो

5) मंगल - 200 ग्रॅम

6) जस्त - 96 ग्रॅम

7) लोह - 80 ग्रॅम

8) तांबे - 15.6 ग्रॅम 

9) बोरॉन - 20 ग्रॅम

10) मॉलिब्डेनम - 2.3 ग्रॅम

11) कोबाल्ट- 1 ग्रॅम

शेणखताची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपाय योजना :-

1) शेणखत पूर्णपणे कुजवण्यासाठी कंपोष्ट कल्चरचा वापर 1 टन शेणखतासाठी 1 किलो किंवा 1 लिटर या प्रमाणात करावा.

2) अर्धवट कुजलेले शेणखत हे भाजीपाला पिकामध्ये वापरल्यास त्या ठिकाणी शेणखत कुजताना उष्णता निर्माण होऊन सूक्ष्मजीवांच्या संख्येवर व भाजीपाल्याच्या मुळांवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे शक्यतो पूर्णपणे कुजलेले शेणखतच वापरावे.

3) शेणखतातुन बुरशीजन्य रोगाचा प्रसार होऊ नये. म्हणून शेणखतात ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लुरोसन्स, यासारख्या जैविक घटकांचा वापर करावा.

4) शेणखतापासून गांडूळखत तयार करून फळबागेस दिल्यास अधिक फायदेशीर ठरते. शेणखत फळबागेस देताना झाडाच्या बाजूला खड्डा घेऊन नंतर मातीने बुजवून टाकावे शेणखत मातीच्या संपर्कात आल्यास लवकर कुजण्यास मदत होते.

5) गोठ्यातील शेण हे खड्डा घेऊन त्यात साठवून त्यावर पाणी टाकून व कंपोष्ट कल्चरचा वापर करून चांगले कुजवून घेऊन ते शेतात मिसळून पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढवता येईल.

त्यासाठी शेतकऱ्यांनी शेणखतावर

1)वेस्टडिकंपोजर

2)ट्रायकोडर्मा

3)रायझोबियम

4))पि एस बी 

 शेणखतावर टाकल्यास निश्चितच फायदा होईल

 

शेतकरी मित्र

विजय भुतेकर

9689331988

English Summary: Cow dunk fertilizer making this best method know about Published on: 28 February 2022, 02:04 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters