कापूस पिक लागवड करून आता ७५-८० दिवस पूर्ण होत आहे, अशा परिस्थितीत कापूस पिक बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे, परंतु सतत पाऊस सुरू आहे,काही भागा मद्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळे कापूस पिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, अशा परिस्थितीत पाते गळ, बोंड गळ तसेच काही ठिकाणी आकस्मिक मर होत आहे आणि या नंतरच्या काळात पीक लाल होणे ही एक
महत्त्वाची समस्या आहे, या सर्व गोष्टींमुळे शेतकरी अडचणीत आहेत बरेच ठिकाणी कापूस पिकाचे नुकसान झालेले दिसून येत आहे.पाते - बोंडे गळ करणे व उपाय कापूस पिकामध्ये पाते गळ व बोंड गळ ही अतिशय महत्वाची समस्या आहे.
Root rot and boll rot are very important problems in cotton crop. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते .कारणे -किडींचा प्रादुर्भाव विपरीत - हवामान ( जास्त प्रमाणात झालेला पाऊस तसेच तापमानातील बदल )अतोनात व अवास्थव झालेली वाढ
नत्रयुक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर हार्मोन्स चे कमी अधिक प्रमाण ( hormanal changes )अन्नद्रव्ये कमतरता व अन्नासाठी होणारी स्पर्धा असे अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात पाते - बोंडे गळ उपाय काहीवेळा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पाते व बोंड गळ होते त्यासाठी शिफारशीत कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे.पिकाची वाढ जास्त झाली असेल तर शेंडा खुडून
घेणे आवश्यक आहे: पीक ३.५-४ फूट झाले की लगेच शेंडे खुडून घेणे त्यामुळे पाते गळ व बोंड गळ थांबते. तसेच गळ फांदीचा सुध्दा शेंडा खुडून घ्यावानत्रयुक्त खतांचा वापर कमी करणे तसेच ०:५२:३४ या पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर करणे 20-50 PPM NAA ( Planofix ) ची ३-५ ml प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे सूक्ष्म अन्नद्रव्ये व NPK यांचा योग्य वापर करणे @ ३० प्रती पंप सूक्ष्म अन्नद्रव्ये वापर करावा
२ टक्के DAP ची फवारणी आपण करू शकतो तसेच Gebrelic acid चा सुध्दा आपण योग्य प्रमाणात वापर केल्यास पाते व बोंड गळ थांबू शकते.आकस्मिक मर - सतत होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यास आकस्मिक मर झालेली दिसून येत, त्यामध्ये झाड अचानक सुकते म्हणजे वाळते, पण खोड व मूळ कुजत नाही, झाड मात्र वाळलेले दिसते तसेच बोंडे गळू लागतात असे याची लक्षणे आहेत,कारणे - सतत पाऊस झाला आणि पाणी शेतात
साचून राहिल्यास हा रोग दिसून येतो तसेच तापमानातील बदलउपाय - १.५ टक्के युरिया व २ टक्के DAP चे द्रावण करून मर झालेल्या झाडाच्या बुडाशी टाकावे तसेच Copper Oxychloride ३०-४० gm प्रती १०-१५ लिटर पाण्यात मिसळून त्याची आळवणी करावी शेतात पाणी साचून राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी पुन्हा ८-१० दिवसांनी २ टक्के युरिया व DAP यांची आळवणी करावी ( १५०-२०० ml पाणी प्रती झाड याप्रमाणे )
Share your comments