कापुस पिकावर वाढ रोधके (संजीवक ) कशी कोणती केव्हा वापरावीत ते आपण पाहणार आहेत.संजीवकाचा वापर हा मुख्यत्वे अंतराशी निगळीत आहे.5X1 /4X1 / ( घन ) अंतरावर कापुस लागवड असेल तर उत्पादन चांगले येण्यासाठी, प्रत्येक कापसाचे झाडास योग्य हवा उण (सुर्यप्रकाश ) मिळाय- ला हवा, यासाठी कापुस पिकाची वाढ मर्यादित असली पाहीजे जर ती वाढ आवास्तव (काईक ) झाली तर
कापसाच झाडास योग्य पूर्ण सुर्यप्रकाश मिळत नाही,Cotton plants do not get proper full sunlight.अशी झाड अन्न तयार करु शकत नाही या कापसाची वाढ ही प्रकाशाच्या दिशेने वर( उंची ) जास्त होते जमीनी पर्यत सुर्यप्रकाश पोहचत नाही, या जमीनित लवकर वाफसा होत नाही ,व फवारणीचे काम योग्य होत नाही.यामुळे सुद्धा रस शोषक किटकांचे प्रमाण वाढते /जमीनीलगतचे सुरवातीचे बोडं ( कैरी ) यांना बुरशीजन्य रोगाचा प्राधुर्रभाव होतो, व ती बोडे
सडतात हे न दिसणारे नुकसाम होते, यासाठी वाढ रोधक संजीवक वापरावी.सर्वसाधारण पणे कापुस पीकासाठी हे 3 प्रकारचे वाढ रोधक संजीवके वापरतात.1)लीहोसीन 50 %2 )मायको सीसीसी40 %3 ) चमत्कार 25 %या प्रमाणात हे असतात यांचे घटक सुद्धा त्यासाठी त्यांचे वापर करण्याचे प्रमाण सुद्धा वेगवेगळे आहे.वाढ रोधकांची काम(कार्य ) करण्याची पद्धत
1 ) झाडाच्या वनस्पतीच्या ( कापुस ) अंतर्गत होणाऱ्या शरीर क्रिया थांबवणे किंवा कमी करणे.2 ) कोब( शेंडा ) वाढ थांबवणे किंवा कमी करणे.3 ) पानातुन पाण्याचे उत्सर्जन कमी करणे.( ताण सहण करणे. )4) झाडास येणा या फुलांचे नियमन करणे. ( दोन फुला तील अंतर कमी करणे कापुस.)1) सर्वसाधारण कापुस पिकास वाढरोधके ही 60ते 70 दिवसापासुन अल्प प्रमाणात कापसाची स्थिती पाहुन
वापरली पाहीजे. आज सर्वसाधारण महाराष्ट्रात कापुस पीक हे 60ते 70 दिवसाचे आहे .प्रथम ज्यांचा कापुस 65 / 70/ 75/दिवसांचा असेन त्यांनी 1 मी .ली लिहोसीन 15 लीटर पंप या प्रमनात वापरावे यामुळे कापसाची काईक वाढ कमी होउन कापसाचीबउत्पादक वाढ होईल. ( फुल /पाती / बोड ) अंतर कमी होईल परत15 दिवसांनी गरज पडल्यास हिच फवारणी 1॥ ( दिडं ) मी ली 15 लीटर
पंप साठी वापरावे यामुळे दोण बोंड ( कैरी ) यांचे अंतर कमी होते, यामुळे पीक दाटत नाही व सर्व झाडास सुर्यप्रकाश योग्य पोहचतो, झाडाचे पोषण चांगले होते, याचा प्रत्यक्ष चांगला परीणाम उत्पादनावर होतो.2)ज्या शेतकरी बांधवांनचा कापुस90 ते 100 दिवसांचा आहे 70ते 90 कैरी (बोंड ) आहेत 5/6 फुट अंतरामधील दोन रांगा (तास ) मध्ये कापुस झाडाचे अंतर भिडण्यास( जवळ ) होण्यास 1ते 1॥ फुट जागा
आहे ज्या शेतकरी बांधवानी नायट्रोजन ( युरिया ) खताचा शेवटाचा हप्ता ( डोस ) दिला असेल, त्यांनी त्यांनी लिहोसीन २ मी ली 15 लीटर पंप साठी वापरावे यामुळे आपनास वरील सर्व परीनाम मिळतील.3). ज्या शेतकरी बांधवाना संपुर्ण (पुर्णपणे ) कापुस वाढ थांबवयाची असेल त्यांनी 2ते 3 मी ली मायको सी .सी.सी हे 15 लीटर पाण्यासाठी वापरावे.या प्रकारे योग्य प्रकारे वाढ रोघक वापरले तर
उत्पादनात लक्षनिय वाढ होते पण चुकीचे पद्धतीने वापरले तर फार मोठे नुकसान होते.4)आपणा कडे मजुर असतील तर मजुरांनी शेंडे खुडणे सर्वात सुरक्षित राहील.5)वरील उपाय करुन जर कापसाची वाढ थांबली व नंतर काही नैसर्गिक कारणाने ( पाणी किड ) या ( कैरी ) बोड फुलपातीचे नुकसान झाल्यास आपण हि उपाययोजना करू शकतात.
१) ) सुपर ऑरगिनीक पीक वृद्धी कारक वेल्थ होर्टी किंवा 5 एलमेंट्स 20 मीली व 2 % युरिया हे 15 लीटर पंप साठी वापरुण फवारणी करावी.लिहोसीन,मायको सी सी सी ही संजीवके जास्त प्रमाणात फवारली गेली व कापसाची वाढ पूर्णपणे खुंटली तर शेतकऱ्यांनी खलील फवारणी करावी.पोट्याशियम हायड्रोजन ऑर्थो फॉस्फेट 75 ग्रॉम .15 लीटर पाण्यात मिसळून फवारावे
श्री शिंदे सर
भगवती सीड्स ,चोपडा
9822308252
Share your comments