1. कृषीपीडिया

शेतकरी मित्रांनो शेतात वाळवीचा उपद्रव वाढलाय ! मग जाणुन घ्या वाळवी नियंत्रणाचा ( Termite Controle )सोपा मार्ग

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जातो. आपण आपल्या शेतात विविध पिके घेत असतो आणि पिकास विविध रोग व कीटक क्षती पोहचवत असतात. एका रिपोर्टनुसार भारतात जवळपास 45% शेतीला वाळवीचा फटका बसत असतो. चला तर मग जाणुन घ्या वळवीच्या बंदोबस्त करण्याची पद्धत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
cankerworm

cankerworm

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जातो. आपण आपल्या शेतात विविध पिके घेत असतो आणि पिकास विविध रोग व कीटक क्षती पोहचवत असतात. एका रिपोर्टनुसार भारतात जवळपास 45% शेतीला वाळवीचा फटका बसत असतो. चला तर मग जाणुन घ्या वळवीच्या बंदोबस्त करण्याची पद्धत.

आधी वाळवी बद्दल जाणुन घेऊया?

वाळवीचे विविध प्रकार असतात. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रांतनुसार वेगवेगळ्या वाळवी आपणांस पाहायला मिळतात. वाळवी साधारणतः पिकांचे मूळ नष्ट करते किंवा जमिनीखाली येणारे पिक नष्ट करते. वाळवी कीटक जमिनीत बोगदे बनवतात आणि वनस्पतींची मुळे खातात.  जेव्हा उद्रेक जास्त असतो तेव्हा ते स्टेम/खोड देखील खातात. ही किडी प्रौढ अवस्थेत मोठी, कडक, राखाडी-तपकिरी आणि सुमारे एक मिलीमीटर लांबीचा असते. वाळवी मातीच्या दरीमध्ये किंवा पडलेल्या पानांच्या खाली लपते. रात्रीच्या वेळी झाडांची पाने किंवा मऊ देठ खातात आणि पिकांचे नुकसान करतात. बटाटे, टोमॅटो, मिरची, वांगी, फुलकोबी, कोबी, मोहरी, राई, मुळा, गहू इत्यादी पिकात जास्त नुकसान करत्यात.

शेतकरी पीक वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतात पण काही प्रकारचे कीड रोग पिके नष्ट करतात. पण वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून कीटकनाशकांशिवाय त्यांचे नियंत्रण करता येते आणि यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांवरील खर्चही कमी होईल. चला तर मग जाणुन घेऊ अशाच एका पद्धतीविषयी, शेतकर्‍यांना शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यांना पिक घेण्यासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो. परंतु माती-निर्मित कीड, जसे की वाळवी, पिके नष्ट करत आहेत.  वाळवी एक पॉलीफॅगस कीड आहे. हे सर्व पिके नष्ट करू शकते.

 

 

 

 

वाळवी काय काय खाते?

वाळवीचा मुख्य आहार लाकूड आहे.  त्यांचे जबडे लाकूड कापण्यास सक्षम असतात.  मानवांसाठी आवश्यक असणारे लाकूड आणि चामड्याच्या वस्तूंचे वाळवी हे सर्वात मोठे शत्रू आहेत.

 

 

 

 

वाळवीचे नियंत्रण कस बरं करणार?

या कीटकांपासून पिके सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांवर बराच खर्च करावा लागतो. कीड नियंत्रणासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून शेतकरी अधिक प्रभावीपणे कीटक नियंत्रण करू शकतात. वाळवीला रोखण्यासाठी कच्चे शेण कधीही शेतात टाकू नये. कच्चे शेण हे वाळवीचे आवडते अन्न आहे. या कीटकांच्या नियंत्रणासाठी बीवरिया बेसियाना बुरशीच्या नाकासह बीजप्रक्रिया करावी. 20 ग्रॅम बिवारिया बेसियाना या बुरशीनाशकाने बिजावर उपचार केल्यानंतर एक किलो बियाणे पेरणीसाठी तयार होते.

 

 

 

 

वाळवी नियंत्रणासाठी घरगुती उपचार काय आहे?

»मक्याच्या कानिसातून धान्य सोडल्यानंतर, उरलेल्या भुट्टे मातीच्या भांड्यात गोळा करावे  आणि शेतात हे भांडे अशा प्रकारे गाडा की मडक्याचे तोंड जमिनीतून बाहेर दिसेल, मडक्यावर एक कापड बांधून त्यात पाणी भरा.  काही दिवसातच तुम्हाला दिसेल की भांडे वाळविने पूर्ण भरलेले आहे. यानंतर, भांडे बाहेर काढा आणि गरम करा जेणेकरून वाळवी मरतील. या प्रकारच्या घागरीला शेतात 100-100 मीटर अंतरावर पुरून द्या आणि भुट्टे सुमारे 5 वेळा बदलून ही क्रिया पुन्हा पुन्हा करा शेतातील वाळवी नष्ट होईल.

 

»सुपारीच्या आकाराचा हिंग एका कपड्यात गुंडाळा आणि दगड बांधून शेताच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याच्या नाल्यात ठेवा. वाळवी याद्वारे नष्ट होतील.

»एक किलो निरमा सर्फ 50 किलो बियान्याला चोळून मिसळून पेरणी केल्यास दीमक प्रतिबंधित होते.

 »गाड्यांचे जळलेले ऑइल भरणा करताना पाण्यातून पिकाला देणे.

 

 

 

 

वाळवीवर रासायनिक नियंत्रण करणार कस?

 »लिंडेन पावडर 1 किलो/10 लिटर पाण्यात विरघळवून पेरणीपूर्वी 1 एकर शेतात फवारणी करावी.

» एक किलो बियाणांवर 4 मिली क्लोरोपायरीफॉस औषधाने बिजोपचार करावा.

» वाळवी नियंत्रित करण्यासाठी, हेक्टरी 4 किलो वाळूमध्ये दोन लिटर क्लोरपायरीफॉस औषध मिसळून पेरणीच्या वेळी शेतात लावावे.

» लक्षात घ्या, पेरणीपूर्वी मागील पिकाचे अवशेष गोळा करणे आणि नष्ट करने गरजेचे आहे.

 

 

 

 

 

English Summary: control of cankerworm Published on: 27 August 2021, 08:56 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters