शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये कृषी सेवा केंद्राचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे,खूप सारे तंत्रज्ञान गावोगावी पोहोचण्याचे एकमेव माध्यम, हल्ली काही बोगस कीटकनाशके,कंपन्या, कृषी सेवा केंद्राच्या मुळे चांगल्या कृषी सेवा केंद्र चालकांना बदनामी भोगावी लागत आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना विनंती करण्यात येते की,आपल्या दुकानातील सर्व औषधी गुणवत्तापूर्वक ठेवाव्यात, आमचा शासनाच्या किंवा कृषी
विभागाच्या पेक्षाही तुमच्यावर विश्वास आहे, कारण शेती करत असताना आम्हाला कोणी उभे करत नाही,No one stops us while farming मात्र कृषी सेवा केंद्रावर सर्व औषधी उधारीवर मिळतात हे मात्र 100% खरे आहे,औषधी सल्ले देणारे भरपूर आहेत, औषधीची मदत मात्र आपल्याकडूनच होते, वेळेवर औषधी मारली तरच उत्पन्नात सुद्धा वाढ होते, पीक सुरक्षित राहते,आपल्याला सुद्धा कंपन्या आता उधार देण्यास टाळतात, कारण नवीन कृषी सेवा केंद्र चालू झाले की
तिथे लगेच औषधी टाकतात ते त्यांच्याकडे आता पर्याय उपलब्ध आहेत,मात्र हल्ली कंपन्या बेवफा होत चालल्या हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, जागोजागी कृषी सेवा केंद्रांना त्यांचे औषधे देत आहेत. पर्यायी तुमच्याकडून औषधी विकल्या जात नाहीत , सोबत जिल्ह्यातील काही अधिकारी यांच्यापासून कृषी सेवा केंद्र त्रस्त आहेत,प्रामाणिकपणे व्यवसाय करून सुद्धा तुम्हाला त्रास होतो. कंपनीचे प्रतिनिधी तर एक वेळेस आले की एका कंपनीचे दुसऱ्या वेळेस आले
की दुसऱ्या कंपनीचे असतात आमचा त्यांच्यावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही. पहिल्या कंपनीतून सोडून दिल्यानंतर दुसऱ्या कंपनीचे महत्व ते सांगतात, मग तेव्हा विश्वास राहतो तो फक्त तुमच्यावर..! जेवढे शेतकरी कृषी विभाग कडे जात नाहीत, तेवढे शेतकरी कृषी सेवा केंद्राकडे मात्र जातात, आम्ही कृषी विद्यापीठ,कृषी विज्ञान केंद्र यांच्या वर्षातून एकदा पायऱ्या चढतो, मात्र शेतीचे डॉक्टर तुम्हीच आहात, राजकारणनंतर शेतकरी एकत्र येण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच कृषी सेवा
केंद्र..! बऱ्याच वेळेस ऐकायला येत कृषी सेवा केंद्र वाले शेतकऱ्यांना लुबाडतात,अहो पाटील इथे आम्हाला सर्वजण लुबडतात, मग राजकारण असो की बाजारपेठ असो, आज प्रत्येक गावी कृषी सेवा केंद्र सुरू झाले आहे, शेवटी व्यवसाय आहे कधी जास्त होईल,कधी कमी होईल,मात्र आपला प्रामाणिकपणा आणि आमचा असलेला तुमच्यावर विश्वास जिवंत राहिला पाहिजे,चांगले तंत्रज्ञान शोधा, नवीन वाण आपल्या दुकानावर ठेवा, चांगल्या प्रतीचे औषधीच आम्हाला द्या, योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन असू द्या.
जय जवान..! जय किसान.!
महेश जाधव
मो.8888128013
लेखक- जैविक कृषी मार्गदर्शन केंद्र,कोलवड जिल्हा बुलढाणा तसेच युवक प्रयोगशील शेतकरी आहेत.
Share your comments