1. कृषीपीडिया

ग्लायफोसेट तणनाशक विक्रीबाबत संभ्रम; विक्री होणार की नाही?

कृषी मंत्रालयाने ग्लायफोसेट या तणनाशकाच्या वापरावर निर्बंध लागू केल्यानंतर राज्यात विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेला माल विकायचा की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. या समस्येविषयी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने कृषी आयुक्तालयात आले असता ‘ग्लायफोसेट विक्रीवर कोणतीही बंदी नाही,’ असा निर्वाळा दिला गेला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
glyphosate herbicide sales

glyphosate herbicide sales

कृषी मंत्रालयाने ग्लायफोसेट या तणनाशकाच्या वापरावर निर्बंध लागू केल्यानंतर राज्यात विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेला माल विकायचा की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. या समस्येविषयी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने कृषी आयुक्तालयात आले असता ‘ग्लायफोसेट विक्रीवर कोणतीही बंदी नाही,’ असा निर्वाळा दिला गेला आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक संरक्षण विभागाने ग्लायफोसेटच्या वापरावर मर्यादा घालणारी अधिसूचना २१ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार, फक्त मान्यताप्राप्त कीड नियंत्रक वापरकर्त्यांना (पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स) ग्लायफोसेटचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी विविध कीडनाशके विकणारे विक्रेते किंवा विकत घेणाऱ्या ग्राहकांना ग्लायफोसेट उपलब्ध होणार नाही, असा अर्थ लावला गेला.

महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या (माफदा) शिष्टमंडळाने मंगळवारी कृषी आयुक्तालयात निवेदन देत या समस्येकडे लक्ष वेधले. गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांच्यासमोर ‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, सरचिटणीस बिपिन कासलीवाल, कोशाध्यक्ष प्रकाश नवलाखा यांनी विक्रेत्यांच्या अडचणी उपस्थित केल्या.

मुख्यमंत्रीसाहेब, शेतीला किमान दिवसा लाइट द्या हो! शेतकऱ्यांची भावनिक साद

या बैठकीनंतर माफदाने एक निवेदन प्रसिद्ध केले. ग्लायफोसेटवर कोणतेही निर्बंध नाहीत. विक्री चालू ठेवावी. अफवांवर विश्‍वास ठेवू नये,’’ असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, कीडनाशके निर्मिती उद्योग क्षेत्रातील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, केंद्राने स्पष्टपणे ग्लायफोसेटवर निर्बंध लादल्याचे नमूद केले आहे. तसेच अमान्यताप्राप्त व्यक्ती किंवा यंत्रणेकडून या तणनाशकाचा वापर झाल्यास कारवाईची तरतूददेखील सांगितली आहे.

आता ऊस आणि द्राक्षला ड्रॅगन फ्रूटचा पर्याय, ड्रॅगन फ्रूट फार्मिंग'ने आणली क्रांती..

एक तर राज्य शासनाने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी किंवा केंद्रापुढे आपली भूमिका मांडून सदर निर्बंध सरसकट मागे घेण्यास भाग पाडायला हवे. कोणत्याही विक्रेत्याला यापुढे पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स व्यतिरिक्त ग्लायफोसेट विकता येणार नाही. विक्रीच्या नोंदीही नोंदीपणे ठेवाव्या लागतील. त्यामुळे या निर्णयाचे सोयीसोयीने अर्थ काढल्यास विक्रेते कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात.

महत्वाच्या बातम्या;
कमी क्षेत्रात लाखोंची कमाई, जळगावच्या शेतकऱ्याने शोधला शेतीतून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग
रिपब्लिक ऑफ कोसोवोने नवी दिल्ली येथे पहिले व्यावसायिक वित्त कार्यालय उघडले
'17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार'

English Summary: Confusion over glyphosate herbicide sales; Will it sell or not? Published on: 04 November 2022, 10:15 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters