1. बातम्या

आता ऊस आणि द्राक्षला ड्रॅगन फ्रूटचा पर्याय, ड्रॅगन फ्रूट फार्मिंग'ने आणली क्रांती..

सध्या ऊस उत्पादक शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. असे असताना आता शेतकरी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. तसेच नेहेमीची पिके सोडून वेगळी पिके देखील घेत आहेत. आता सांगलीत शेतकरी ऊस, द्राक्षे, सोयाबीन आणि भाजीपाल्याची शेती सोडून ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळले आहेत. तसेच यातून चांगले उत्पादन काढत आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
dragon fruit farming

dragon fruit farming

सध्या ऊस उत्पादक शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. असे असताना आता शेतकरी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. तसेच नेहेमीची पिके सोडून वेगळी पिके देखील घेत आहेत. आता सांगलीत शेतकरी ऊस, द्राक्षे, सोयाबीन आणि भाजीपाल्याची शेती सोडून ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळले आहेत. तसेच यातून चांगले उत्पादन काढत आहेत.

सांगली जिल्हा हा अनेकदा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. याठिकाणी ऊस, डाळींब, द्राक्षे अशी पिके घेतली जातात. मात्र आता बदलत्या हवामानामुळे ही पिके धोक्यात येतात. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. आता ही पिके सोडून येथील शेतकरी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे वळले आहेत. तसेच हे शेतकरी यातून चांगली कमाई करत आहेत.

येथील अनेक गावात गेल्या 6 वर्षांपासून अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूटचे बंपर उत्पादन घेत आहेत, त्यात सांगलीतील अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे, शेतकरी आनंद राव पवार, नानासाहेब माळी आणि राजाराम देशमुख, हे शेतकरी आहेत. सोलापूरच्या एका शेतकऱ्याकडून प्रेरणा मिळाल्याचे आनंदराव पवार यांनी सांगितले.

छत्रपतीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी शड्डू ठोकला! जाचक-घोलप-काकडे एकाच व्यासपीठावर

तसेच यामध्ये दीड एकर शेतात ड्रॅगन फ्रूट पिकवून हा शेतकरी 27 लाख रुपये कमावत होता. यानंतर 2016 मध्ये आनंद पवार यांनीही या शेतीचा निर्णय घेतला. यामधून आता ते लाखो रुपये कमवत आहेत. भारतातून निर्यात होणाऱ्या ड्रॅगन फ्रूटला भारतात ड्रॅगन फ्रूट एक्सोटिक फ्रूट म्हणतात.

'शेती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकार कृषी स्टार्टअप्सना मदत करत आहे'

येथील शेतकऱ्यांनी त्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. आता हे विदेशी फळ परदेशातही निर्यात होत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. दुबई, न्यूझीलंड, हैद्राबाद, बंगळुरू, गुवाहाटी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रूट पाठवले जात आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ देखील मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
मुख्यमंत्रीसाहेब, शेतीला किमान दिवसा लाइट द्या हो! शेतकऱ्यांची भावनिक साद
"मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरुन शेट्टींचा पवारांना टोला"
लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ, मिळतोय आतापर्यंतचा सर्वाधिक दर

English Summary: replacing sugarcane grapes dragon fruit, dragon fruit farming brought revolution. Published on: 03 November 2022, 03:17 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters