MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

ग्राम डोंगरगाव येथे लिंबू फळबाग लागवड व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

कृषि विज्ञान केंद्र, अकोला द्वारे प्रशिक्षणाचे आयोजन

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
ग्राम डोंगरगाव येथे लिंबू फळबाग लागवड व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

ग्राम डोंगरगाव येथे लिंबू फळबाग लागवड व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

कृषि विज्ञान केंद्र,अकोला द्वारे प्रशिक्षणाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र,अकोला द्वारे दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी ग्राम डोंगरगाव तालुका अकोला येथे लिंबू फळ उत्पादक शेतकरी बांधावा साठी नवीन लागवड केलेल्या आणि जुन्या बागायत दार शेतकरी बांधवासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गजानन तुपकर, विषय

विशेषज्ञ(उद्यानविद्या) कृषि विज्ञान केंद्र, अकोला यांनी नवीन लिंबू लागवड केलेल्या शेतकरी बंधूना खतांचे आणि पाण्याचे नियोजन, किडी आणि रोग व्यवस्थापन, तन व्यवस्थापन, प्रारंभिक काळामध्ये छाटणी आणि झाडांना कश्या पद्धतीने वळण द्यावे,Early pruning and how to turn trees, सिंचन व्यवस्थापन करत असताना ठिबक सिंचनाचे आणि दुहेरी आळे पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन,

अमृत जल निर्मिती तंत्र या विषयी सविस्तर माहिती दिली. पाच वर्षानंतरच्या बगीचामध्ये अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन करताना हस्त बहार कश्या पद्धतीने नियोजन करावे, निंबोळी ढेप चे महत्व, बोर्डोमिश्रण आणि बोर्डो मलम तयार करणे, इत्यादी अनेक बाबींवर मार्गदर्शन केले.शेतकरी बंधूनी लिंबू पिकामधील विविध समस्या

मांडल्या त्या समस्येवर श्री गजानन तुपकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्नांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील श्री योगेश नागापुरे, विनोद नागापुरे,संतोष खिरोडकर तसेच मासा, कुंभारी, सिसा येथील मोठ्या संख्येने लिंबू उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी रावे चे विद्यार्थी बिस्वाल, मोहित डागर, शुभम हनवते यांनी अथक परिश्रम घेतले.

English Summary: Completed lemon orchard management training at village Dongargaon Published on: 30 August 2022, 03:54 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters