हवामान अंदाज:-
भारतीय हवामान खात्याने आज वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात दि. १५ ते १८ जानेवारी दरम्यान कोरडे हवामान राहण्याची व किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
कृषी सल्ला:-
सततचे ढगाळ वातावरण, उच्च आर्द्रता व थंडीमुळे पिकांवर, फळबागांमध्ये कीड-रोग यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून कीड-रोग व्यवस्थापनासाठी "एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन" पद्धतीचा अवलंब करावा. तसेच दोन किंवा त्यापेक्षा जास्त फवारणीसाठी एकाच कीडनाशकाचा वापर टाळावा.
किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने, पिकांना, फळबागांना ओलीत करताना शक्यतो रात्रीच्या वेळी करावे जेणेकरून थंडीमुळे पिकांना, फळबागांना ईजा होणार नाही.
उन्हाळी भुईमुंगाची पेरणी करताना स्थानिक हवामान परिस्थिती लक्षात घ्यावी, कारण १५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान भुईमुंगाच्या अंकुरणास बाधक ठरू शकते.
थंडीपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी जनावरांना उघड्यावर न बांधता बंदीस्त गोठ्यात बांधावे.
सततचे ढगाळ वातावरण, उच्च आर्द्रता व थंडीमुळे पिकांवर, फळबागांमध्ये कीड-रोग यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून कीड-रोग व्यवस्थापनासाठी "एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन" पद्धतीचा अवलंब करावा. तसेच दोन किंवा त्यापेक्षा जास्त फवारणीसाठी एकाच कीडनाशकाचा वापर टाळावा.
किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने, पिकांना, फळबागांना ओलीत करताना शक्यतो रात्रीच्या वेळी करावे जेणेकरून थंडीमुळे पिकांना, फळबागांना ईजा होणार नाही.
थंडीपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी जनावरांना उघड्यावर न बांधता बंदीस्त गोठ्यात बांधावे. तसेच जनावरांचा गोठा ओलसर न राहता कोरडा राहील याची काळजी घ्यावी.
थंडीच्या काळात कमी सुर्यप्रकाश कालावधीमुळे कोंबड्यांच्या अंडी उत्पादनात घट होते. यावर उपाय म्हणून कोंबड्यांच्या शेडमध्ये जास्त काळ सुर्यप्रकाश राहील अशी व्यवस्था करावी.
Share your comments