1. कृषीपीडिया

शीतगृह नविन, विस्तारीकरण, आधुनिकीकरण योजना

फळे, फुले, भाजीपाला , औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचा दर्जा कायम ठेउन आयुष्य वाढविणे,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शीतगृह (नविन, विस्तारीकरण, आधुनिकीकरण)

शीतगृह (नविन, विस्तारीकरण, आधुनिकीकरण)

फळे, फुले, भाजीपाला , औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचा दर्जा कायम ठेउन आयुष्य वाढविणे, प्रक्रिया प्रकल्प धारकांना वर्ष भर कच्च्या मालाचा पुरवठा करणे यासाठी शीत गृह आवश्यक असते.

माप दंड व अर्थसहाय्याचे स्वरुप- 

नविन शीतगृह (एकसारख्या तापमानात राहणारे उत्पादनासाठी ) (प्रती चेंबर 250 मे.टन पेक्षा जास्त) रु.8000 प्रती मे.टन हा माप दंड आहे. या खर्चाच्या सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु.140 लाख अर्थ साह्य देय आहे.

डोंगराळ व अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारत घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.200 लाख अर्थ साह्य देय आहे.

अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात.

प्रती लाभार्थी जास्तीत जास्त 5000 मे. टन क्षमते पर्यंतच्या शीत गृहा साठी अनुदान देय आहे. एन एच बी च्या तांत्रिक प्रमाणका प्रमाणे शीत गृहाची उभारणी करावी.

पात्र लाभार्थी-  

अ. वैयक्तीक लाभार्थी- 

वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय आहे.

ब. इतर लाभार्थी - 

राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या या संस्था/कंपन्यांना अनुदान वगळता

प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखा परिक्षण केलेल्या मागिल 3 वर्षाचे पुरावे सादर करावे लागतील.

अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालय

 

उद्देश -फळे, फुले, भाजीपाला , औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचा दर्जा कायम ठेउन आयुष्य वाढविणे, प्रक्रिया प्रकल्प धारकांना वर्ष भर कच्च्या मालाचा पुरवठा करणे यासाठी शीत गृह आवश्यक असते.

English Summary: Cold storage new construction modern lization schemes Published on: 09 February 2022, 04:35 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters