1. कृषीपीडिया

बघा या योजनेसाठी केंद्र सरकार देतय शंभर टक्के अनुदान

काही वेळा इच्छा असून देखील शेतकरी पैश्या अभावी यांत्रिक शेती करू शकत नाही अशावेळी सरकार शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदान

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
केंद्र सरकार देतय शंभर टक्के अनुदान

केंद्र सरकार देतय शंभर टक्के अनुदान

काही वेळा इच्छा असून देखील शेतकरी पैश्या अभावी यांत्रिक शेती करू शकत नाही अशावेळी सरकार शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदान कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural mechanization scheme) राबवत आहे, अशा कृषी यांत्रिकीकरण योजनेची आपण आज माहिती पाहणार आहोत.

आता शेतकरी आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहे त्यामुळे शेतात नवनवीन योजना तसेच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत

पारंपारिक शेती (Traditional farming ) नव्या पद्धतीने आकार देत आहेत व उत्पन्न कमवत आहेत शेतकऱ्यांचे या प्रयत्नांना सरकारदेखील साथ देत आहेत व त्यांच्या साठी वेगवेगळे योजना राबवत आहेत.

योजना काय आहे?

कृषी मंत्रालय ने शेतीमध्ये आधुनिक यांत्रिकीकरणाला (To modern mechanization) प्रोत्साहन देण्यासाठी पाऊल पुढे उचलत कृषी यांत्रिकीकरण सबमिशन योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नांगरणी, पेरणी, वृक्षारोपण, कापणी व कचरा व्यवस्थापनासाठी (For waste management ) वापरला जाणारा मशीन्स ( machine) आता सहज मिळतील.

यंत्रावर शंभर टक्के अनुदान

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत आहे, यासाठी केंद्र सरकारने काही अविकसित राज्यांसाठी 100 टक्के अनुदान कृषी यंत्रांवर देऊ केले आहे. यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयाही खर्च लागत नाही. जर एखाद्या शेतकऱ्याला कस्टमर हा यरिंग सेंटर (Customer’s Earring Center ) सुरू करायचा असेल तर त्यांना एक रुपया देखील गुंतवणूक करावी लागणार नाही.

 

भाडेतत्त्वावर कृषी यंत्रे

कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर (On a rental basis ) कृषी यंत्र पुरवीत असते. 

यासाठी देशामध्ये 42000 कस्टमर हायरिंग सेंटर सुरू केले आहेत. इथून आपण शेतीसाठी भाडेतत्वावर कृषी यंत्रे घेऊ शकतो.

शेती यांत्रिकीकरण सबमिशन (Agricultural mechanization submission) योजना आधुनिक शेती (Modern agriculture ) यंत्रणा देखील उपलब्ध करून देते. जसं की लँड लेव्हलर, शून्य पर्यंत बियाणे धान्य पेरण्याचे यंत्र,(Drill) मल्चर इत्यादीमुळे केवळ शेती सुलभ होतं नाहीतर उत्पादनही दुप्पट होण्यास मदत होते.

English Summary: Central government give 100% subsidy for this scheme Published on: 24 January 2022, 07:04 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters