हवेतील आद्रता, सातत्याने पडणारा पाऊस, जमिनीत साचून राहणारे पाणी, पीक वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध नत्राची कमतरता, चुकीचा लागणीचा हंगाम यामुळे उसाला तुरा येण्यास उत्तेजन मिळते. अलीकडच्या काही वर्षांच्या हंगामात नैसर्गिक वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे उसाला फुलोरा येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ऊस पक्व होण्याच्या कालावधीपूर्वीच अकाली फुलोरा येत असल्याचे दिसत आहे.
अनुकूल हवामानामुळे उसाला तुरा येत आहे नैसर्गिकरीत्या उसाला १० ते १२ महिन्यांत तुरा येतो. साधारणपणे ६ महिने वयाच्या उसाला आणि ३ कांड्यांवर ऊस असताना तुरा आल्याचे दिसून आले आहे. पूर्णपणे तुरा उमलण्यास कमीत कमी सात दिवसांचा कालावधी लागतो जास्तीत जास्त जातीनुसार एक महिना लागतो.
ऊस आणि साखर उत्पादनाच्यादृष्टीने तुरा येणे नुकसानकारक ठरत आहे. लागवड सुरु, पूर्वहंगामी किंवा आडसालीमध्ये केली तरी तुरा येतो. हवामानातील बदलाबरोबरच दिवस लहान व रात्र मोठी होत असताना तुरा बाहेर पडतो.
इतिहासात पहिल्यांदाच कारखान्याचा काटा लॉक!! पट्ट्याने आणला तब्बल 47.451 टन ऊस
तुरा आल्यानंतर दोन महिन्यांनी साखर व ऊस उत्पादनावर परिणाम होतो. तुरा येण्याचा कालावधी हवामान विभागाप्रमाणे बदल असतो. फुलोरा तयार होणे व बाहेर पडणे प्रक्रियेचे अवलोकन केले असता कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यात तुरा ऑक्टोबर महिन्यात येतो. तर उर्वरित महाराष्ट्रात नोव्हेंबर पासून तुरा दिसू लागतो.
उशिरा तुटलेल्या उसाचा खोडवा राखल्यास त्यांच्या वाढीवर तुऱ्यांमुळे परिणाम होतो. त्यामुळे साखर उता-यात १८-२० % घट येते, तुरा आल्यानंतर पाने अरुंद होऊ लागतात, ती पिवळी पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे सर्व प्रकारची क्रिया मंदावते जेठाकोंब असलेल्या उसाला तुरा हमखास येतो.
आता तर काळजीच मिटली! भारतातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार, उन्हापासून होणार चार्ज
हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६५ ते ९० % असल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होतो. दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान २३ अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचते. अशा वेळी दोन्ही तापमानातील फरक सातत्याने कमी राहतो.
रात्रीचे जास्त, दिवसाचे कमी तापमानामुळे उसाच्या कायिक वाढीचे रूपांतर प्रजनन अवस्थेत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. अशा प्रकारचे हवामान सतत १० दिवसांपेक्षा जास्त दिवस मिळाल्यास तुऱ्याच्या फुलकळीस सुरुवात होण्यास हवामान अनुकूल ठरते, फुलकळीच्या वेळी तापमान आणि सूर्यप्रकाश कमी असताना तुरा जास्त येतो. युरियामुळे तुरा प्रमाण वाढते. पाचट जाळून युरियाच्या वापर केल्यास ६१ टक्क्यांपेक्षा तुरा जास्त येतो.
उसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबून पांगशा फुटतात. बाजूला फुटवे लागतात. उत्पादनात १५-२५ टक्के घट येते. उसाला तुरा येऊ नये यासाठी शिफारशीत वेळेतच लागवड करावी. पाणी आणि खतांचा योग्य वापर करावा. ऊस पक्व होण्याच्या कालावधीपूर्वी अवकाळी तुरा येत असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या;
गव्हाची दरवाढ कायम राहणार? जाणून घ्या दरवाढीचा परिस्थिती
पीएम किसान’चे प्रलंबित लाभार्थींनी बँक खाते उघडावे, कृषी आयुक्तालयाकडुन आवाहन
घरकुल योजनेचे पैसे घेऊन घर बांधले नाही तर होणार गुन्हा दाखल, 6952 लाभार्थ्यांना न्यायालयाची नोटीस
Share your comments