1. कृषीपीडिया

रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतरण करताना घ्यावयाची काळजी

रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतरण हे शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे घेऊन जाणारा मार्ग असून यात शेतासोबतच

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतरण करताना घ्यावयाची काळजी

रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतरण करताना घ्यावयाची काळजी

रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतरण हे शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे घेऊन जाणारा मार्ग असून यात शेतासोबतच शेतकऱ्यांच्या मानसिकतेत देखील बदल घडून येतो. नवनवीन शिकण्याची इच्छा आणि चालत असलेल्या प्रथेला छेद देत सेंद्रिय शेतीत रूपांतरण घडवून येते. रूपांतरणाच्या प्रक्रियेत संक्रमण काळ द्यावा लागतो. तोपर्यंत आपली जिद्द आणि धीर सांभाळत प्रयत्न सुरू ठेवावे लागतात. मी आपल्याला ज्या पद्धतीने रूपांतरण सांगणार आहे त्यात संक्रमण काळ कमी लागतो. हा काळ शेताच्या प्रकारानुसार वेगवेगळा असेल.

सेंद्रिय शेतीत रूपांतरण करताना खालील बाबींचा विचार करून आपला आराखडा तयार करावा:

१) शेतीचा प्रकार : एकूण क्षेत्रफळ, पिकांचे असलेले वर्गीकरण

२) मातीचा प्रकार : मातीचा पृथक्करण अहवाल, मातीत असलेले सेंद्रिय कर्ब, नापीक होत असलेला भाग

३) वातावरण : आपला परिसर कोणत्या पर्जन्य प्रकारात मोडतो, सरासरी तापमान, आर्द्रता

४) गोबर, गोमूत्र, इतर सेंद्रिय पदार्थांचा स्त्रोत

५) उपलब्ध भांडवल, शेतमजूर

६) जवळपासची बाजारपेठ

वरील सर्व बाबींची माहिती मिळाल्यानंतर करावयाची कामे:

१) सेंद्रिय शेतीबद्दल माहिती मिळवणे व त्यावर अभ्यास करणे.

२) घरात-कुटूंबात चर्चा करणे.

३) आपल्या शेतात कोणती पद्धत लागू शकेल यावर विचार करणे व गरज पडल्यास अनुभवी व्यक्ती सोबत चर्चा करणे.

४) सेंद्रिय शेतीची पद्धत ठरवणे.

 

रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत रूपांतर करताना करावयाची कामे:

१) रूपांतरणाच्या प्रक्रियेला सुरू करण्याआधी रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याऐवजी सेंद्रिय खत उदा. कम्पोस्ट खत, हिरवळीचे खत ( बोरू, धैचा, सनहेम्प) यांचा वापर जास्त करावा.

२) जनावरांचे मलमूत्र जमा करण्याची व्यवस्था करावी.

३) कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी व्यवस्था करावी.

४) पीक कापणीनंतर राहीलेले पिकांचे अवशेष त्याच शेतात रोटावेटर करावे.

५) जीवामृत-वेस्ट डिकंपोझर बनवण्यासाठी व्यवस्था करावी.

६) मल्चिंग करण्यासाठी गवत अथवा झुडूप लागवड करावी.

७) फेरोमेन ट्रॅप, स्टीकर इ. ची व्यवस्था करावी.

सेंद्रिय शेती करताना सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याबाबतचे अद्ययावत ज्ञान. माझ्या लेखमालिकेतून ते दिले जाईलच पण आपणही वेगवेगळ्या माध्यमांतून ते मिळवत राहावे.

 

भावेश सोमाणी – 8329215490

English Summary: Care to be taken while converting chemical farming to organic farming Published on: 18 February 2022, 09:39 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters