1. कृषीपीडिया

करा तुळशीची लागवड आणि सरकारी कर्ज, अनुदानसह तीन महिन्यात कमवा 3 लाख

आपल्याला माहित आहेच की तुळशी अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीला आपल्याकडे खूप प्रमाणात धार्मिक महत्त्व तर आहेच पण तुळस तिच्या आयुर्वेदिक गुणांमुळे डोकेदुखी पासून ते कर्करोगा पर्यंतच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
basil cultivation

basil cultivation

आपल्याला माहित आहेच की तुळशी अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीला आपल्याकडे खूप प्रमाणात धार्मिक महत्त्व तर आहेच पण तुळस तिच्या आयुर्वेदिक गुणांमुळे डोकेदुखी पासून ते कर्करोगा पर्यंतच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

त्या अनुषंगाने जर आपण तुळशीची शेती करण्याचा विचार केला तर ते फायदेशीर ठरू शकते. तुळशी लागवड बियांपासून किंवा पाण्यात रुजवून रोपांची लागवड करणे सोपे आहे. तसेच त्याला कमी देखभाल आवश्यक आहे. तुम्ही तुळस घरांमध्ये कुंडीत ठेवू शकता किंवा तुमच्या भाज्या किंवा शोभेच्या बागेत देखील आंतरपीक म्हणून तुळशी लागवड करू शकता.

 तुळशी लागवडीची पद्धत

  • बियांपासून तुळशीची लागवड
    • उच्च गुणवत्तेच्या मातीने फ्लावर प्लांटर अर्धवट भरा आणि त्यात पूर्णपणे पाणी द्या. सुमारे एक इंच खोली पर्यंत बी सोडा.
    • माती ओलसर करण्यासाठी पुरेसे पाणी घाला परंतु जास्त नको.
    • जर तुम्ही तुळशी बाहेर बेड करून ठेवू इच्छित असाल तरीही ते रोपं करण्यापूर्वी घरामध्येच वाढविण्याचा सल्ला दिला जातो.
  • जमिनीच्या पृष्ठभागाखाली 14 इंच बिया पेरा. तुळशीच्या बिया खूप लहान असल्यामुळे त्या जमिनीच्या वर शिंपडा आणि हळुवारपणे बोटाने दाबा.
  • तुळशीच्या बिया खूप संवेदनशील असल्यामुळे स्प्रे बाटलीने मातीच्या पृष्ठभागावर हलके शिंपडा.
  • बियाण्यांना त्रास होऊ नये म्हणून भांड्यात पाणी टाकणेतसेच हळूहळू आणि काळजीपूर्वक केले पाहिजे
  • फ्लॉवर कंटेनर चा वरचा भाग प्लास्टिकच्या आवरनाणेझाकल्या ने  ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. तरीही आपल्याला माती तपासावे लागेल आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त पाणी द्यावे लागेल.
  • तुमच्या वनस्पतीला दररोज सात ते आठ तास थेट सूर्यप्रकाश आणि किमान 70 अंश फॅरेनहाईट तापमान आवश्यक असते
  • भांडे अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल.
  • रात्रभर तापमान कमी झाल्यास झाडाला खिडक्‍या किंवा दारे उघडे न ठेवण्याची काळजी घ्या.

 फक्त पंधरा हजार रुपये गुंतवावे

 या व्यवसायाचे सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला सुरुवात करण्यासाठी खूप पैशांची गरज नाही. तसेच तुम्हाला ते करण्यासाठी खुप जमिनीची देखील गरज नाही. तुम्ही हा व्यवसाय पंधरा हजार रुपयांमध्ये सुरू करू शकतात.

तीन महिन्यात कमवा तीन लाख

 बियाणे पेरल्यानंतर तुम्हाला या व्यवसायात कापण्यासाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागत नाही. हे रोप फक्त तीन महिन्यात तयार होणार असून तुळशीचे पीक सुमारे तीन लाख रुपयांना  विकला जाणार आहे.अनेक आयुर्वेदिक उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना तुळशीची रोपे लागतात. अशाप्रकारे ते कंत्राटी शेतीद्वारे त्यांची खरेदी करतात. डाबर, वैद्यनाथ आणि पतंजली सह अनेक कंपन्या तुळशीच्या शेतीत गुंतलेले आहेत.

 तुळशीच्या शेतीसाठी कर्ज आणि अनुदान..

 नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड जेआयुष मंत्रालया चा भाग आहे. शेतकऱ्यांना औषधी पीक लागवड आणि व्यवस्थापनासाठी अनुदान देते. अनुदान संस्थेच्या प्रजातींच्या व्याख्या वर आधारित आहे.

याबाबतची माहिती नॅशनल मेडिसनल प्लांट बोर्ड च्या वेबसाइटवर स्पष्टपणे नमूद केले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय एन ए एम योजनेतील औषधी वनस्पतींचा भाग लागू करत आहे, ज्यामध्ये निवडलेल्या जिल्ह्यांमधील विशिष्ट क्‍लस्टर आणि झोन्स मध्ये प्रधान्य औषधी वनस्पतींची बाजार चलीत शेती समाविष्ट आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 140 औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी विशिष्ट वनस्पती प्रजातींच्या उत्पादन खर्चाच्या 30 टक्के, 50 टक्के आणि 75 टक्के अनुदान दिले जाते. एन ए एन ए 2015 -16 2019- 20 या कालावधीत एकूण 48 हजार 40  हेक्‍टरवर औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी निधीदिला आहे.

 ( संदर्भ- हॅलो कृषी )

English Summary: can earn basil cultivation get help to goverment loan and subsidy more profit Published on: 04 January 2022, 06:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters