कॅल्शियम हे धनप्रभारित (Ca++) आयन असल्यामुळे इतर धनभार असलेल्या अन्नद्रव्यांसोबत शोषणासाठी स्पर्धा निर्माण होते. जसे सोडिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, अमोनिअम, लोह आणि ॲल्युमिनिअम.
सोडियम -
सोडिअमचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत मातीच्या कणांवरील कॅल्शियम सोडिअममुळे दूर लोटला जातो. परिणामी, कॅल्शियमचे विद्राव्य स्वरूपात जमिनीतून वहन होते व ऱ्हास होतो. सोडिअमचे प्रमाण अधिक झाल्यामुळे पिकांना सोडिअममुळे हानी होते. यामुळेच क्षारयुक्त व चोपण जमिनीत कॅल्शियम (जिप्सम) टाकला जातो.
स्फुरद -
जमिनीचा सामू ७ पेक्षा जास्त असेल तर मुक्त चुना मातीमध्ये जमा होतो. अशा स्वरूपातील उपलब्ध कॅल्शियम इतर अन्नद्रव्यांशी रासायनिक क्रिया करतो.
स्फुरद ऋणप्रभारित आयन असल्यामुळे मुक्त चुना व स्फुरद यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होते. पिकांना कॅल्शियम उपलब्ध होऊ शकत नाही. ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, अशा जमिनीत स्फुरदाची उपलब्धता कमी होते.
लोह आणि ॲल्युमिनियम -
ज्या जमिनीचा सामू ७.० पेक्षा कमी असतो, अशा जमिनीत लोह आणि ॲल्युमिनियम उपलब्धता जास्त असते. त्यामुळे अशा जमिनीतील कॅल्शियमची उपलब्धता घटते.
बोरॉन -
ज्या जमिनीत व पिकांमध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असते, अशा जमिनीत पिकांमध्ये बोरॉनची उपलब्धता व शोषण यावरदेखील विपरीत परिणाम होतो.
त्यामुळेच बोरॉनची अति उपलब्धता किंवा कमतरता पिकांमध्ये व जमिनीत होऊ नये म्हणून कॅल्शियम फवारणी व जमिनीतून दिल्यास फायदा होतो.
कॅल्शियम -
जमिनीतील विविध मुलद्रव्यांचा कॅल्शियम हा घटक आहे. जमिनीत पुरेश्य़ा प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध आहे.
कॅल्शियम चे कार्य
पेशी विभाजन व पेशी लांब होण्यासाठी अत्यंत गरजेचे अन्नद्रव्य
पेशी भित्तिका परिपुर्ण तयार होण्यासाठी आवश्यक
नायट्रेट च्या शोषणात आणि त्याच्या वापरात गरजेचे. पिके दिलेला नत्र याच नायट्रेटच्या स्वरुपात ग्रहण करित असतात. त्यामुळे पिकाच्या शाकिय वाढीच्या काळात कॅल्शियम ची गरज भासते.
पिकातील विविध संप्रेरकांच्या कार्यासाठी गरजेचे
शर्करा तयार होवुन त्याच्या वापरासाठी गरजेचे.
कॅल्शियम पिकामध्ये रसवाहीन्यांद्वारे (Xylem) द्वारे आयन एक्सचेंज (मुलद्रव्यांची अदला-बदली म्हणजेच आयन एक्सचेंज जसे संगित खुर्ची एक किंवा वस्तुंची देवाण घेवाण) पध्दतीने वाहुन नेले जाते.
कॅल्शियम लिग्निन च्या कणांना चिकटते आणि त्यानंतर समान अशा मॅग्नेशियम, सोडीयम, पालाश किंवा अमोनिकल आयनच्या बदल्यातच कॅल्शियमचे एक्सचेंज होत असते.कॅल्शियम पिकात सहजासहजी वाहुन नेले जात नाही, त्यामुळे थोडा-थोडा पण सतत कॅल्शियमचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
Share your comments