ब्रिटिशांच्या तावडीतून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताच्या तीन बॅरिस्टर सुपुत्रांनी जीवन खर्ची घातले. खितपत पडलेल्या ग्रामीण भागाचे जीवनमान उंचावण्यासाठी, बॅरिस्टर महात्मा गांधी, बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व बॅरिस्टर डॉ. पंजाबराव देशमुख , हेच या देशाचे महान नेते व थोर समाज सुधारक होते. आणि त्याच समान विचाराचे असलेले शाहू महाराज, ही सर्व विद्वान मंडळी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कालांतराने सत्तेच्या बाहेर का पडली? हा खरा मोठा गहन प्रश्न आहे?. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या सुपुत्राने आपल्या रक्ताचे पाणी केले. ग्रामीण भाग, समृद्ध बलशाली करण्यासाठी अहोरात्र झटले, ती सर्व महान विद्वान मंडळी, सत्तेच्या बाहेर का गेले ? याचा विचार मात्र सामान्य जनतेनी कधीच केलेला नाही. सत्तेत राहुन शेतकरी, शेतमजुरांचे भले होणार नाही , ही पुढील काळाची पावले त्यांनी ओळखली. मूळ संविधानात परिशिष्ट 9 घेऊन बदल करण्यात आला व तसा 18 जून 1951 ला पाहिली घटना दुरुस्ती करून ठराव सुद्धा पारित करण्यात आला. नवीन अस्तित्वात आलेले कायदे हे शेतकरी, शेतमजुरांना संपविण्या साठीच केलेली ही सुरुवात आहे असे त्यांनी नक्कीच हेरले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शेतकरी समृद्धीच्या व्यवस्थेला लागलेले ग्रहण त्यांनी ओळखूनच ते बाहेर पडले .
नेहरू नीतीची चाल, या महान विद्वानांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. नंतर पुढे औद्योगिकरणाच्या झपाट्यात, शेतकरी मारण्याचे या देशात छडयंत्र सुरू झाले.
सत्ता हेच शहाणपण अशी गंगोत्री तयार झाली. तेव्हा पासूनच ग्रामीण भागाला भकास करणाऱ्यांची संख्या सत्तेच्या मोहाने वाढत गेली, मात्र सत्तेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याची संख्या ही नाममात्र होत गेली. सत्ताधीश आणि विरोधी पक्षांची मिलीभगत सुरू झाली व बॅरिस्टराच्या बुद्धिमत्तेचा पाला पाचोळा करण्यास सुरुवात झाली . तेव्हापासूनच शेतकऱ्यांचे वाटोळे होण्याची सुरूवात झाली. ज्या देशात शेतकऱ्यांचे बेहाल करून देश चालविला गेला, अश्या लुटारु पंडिताची वर्णी लागली . या देशातला शेवटच्या घटकांचा कर्णधार अन्नदात्याला उपाशी ठेवून, पोटाची खळगी भरू न देता त्याला जीवनात्तून संपविण्याचे कटकारस्थान या स्वातंत्र्यप्रिय देशात रचण्यात आले. कालांतराने महाभकास योजनेच्या शिल्पकाराच्या हातात सत्ता राहीली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- सुशिक्षित वर्गाने राजकारणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. नाहीतर अंगठेबहाद्दर, व अर्ध शिक्षित, अडाणी लोकांचे गुलाम व्हावे लागेल. "
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीच्या व्यवस्थेची लढाई सुरू झाली. त्यामुळे लुटारूचा देश तयार झाला. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली शेतकऱ्यांनी आपले दुःख पचवून तो इतरांच्या आनंदात सहभागी झाला. शेतकऱ्यांना लूटण्यासाठी भामटे राज्यकर्ते गावोगाव फिरू लागले. व आर्थिक प्रलोभने देऊन, सूट सबसिडीचे दिंडोरे पिटवून गावातील शेतकऱ्यांना नाचवणे सुरू झाले. शेतकऱ्यांच्या लुटीचा कल्ला वाढू नये व तो जनतेच्या लक्षात येऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना खिरापती वाटून तो कल्ला सतत दाबल्या गेला . असेच सत्ताधीशांनी, राज्यकर्त्यांनी सतत नियोजन केले. यासाठीशेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव कमी दिल्या जात असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्या जवळ पैसा जमा होऊ दिला नाही म्हणून, खेडेगावात जिल्हा परिषदचे व जिल्हा पातळीवर सरकारी दवाखाने, व शाळा सुरू करण्यात आल्या. तेव्हापासूनच शेतकरी महाभकास क्रांतीची खरी सुरुवात झाली. राष्ट्रगीताची धून भोळ्याभाबड्या जनतेच्या कानावर टाकून, लूटमार सुरू झाली.
" ओ मेरे देश की धरती, सोना उगले- उगले हीरे मोती "अशी क्रांती गीते देशभर गाजत राहिली. तरी पण हा बळीराजा देशासाठी, बलिदान देऊन, स्वतःलाच संपवीत राहिला. शेतकऱ्यांच्या नावावर मोर्चे काढून सर्व राजकीय पक्ष आपल्या दुकानात माल भरत राहीले. राज्यकर्ते स्वतःच सत्तेत असून, या देशाचा नोकर असलेल्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याची परंपरा सुरू झाली. जिल्हाधिकारी या विषयावर काय निर्णय घेणार? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बेवखुप बनवणारी व्यवस्था सुरू झाली.
"गंगेचं पाणी उलट्या दिशेने वाहायला लागले."
लुटारूच्या ग्यांगा व अड्डे तयार झाले. मात्र या देशाचा पोशिंदा, ही सर्व दिशाहीन व्यवस्था, आणि स्वतःच्या मुलाच्या प्रपंचाची होत असलेली राखरांगोळी, बळीराजा डोळ्यात पाणी आणून, केविलवाण्या नजरेने अंधकारमय जीवन सरकारच्या आशेवर जगतच राहिला. सत्तेतील राजकीय पक्षांनी फक्त शेतकऱ्यांचा जयघोष करून, उत्पादन वाढविण्याच्या नादात त्याला लावून, व शेतमालाला भाव कमी देऊन सतत मातीत गाढले. राज्यकर्ते हेच महाभकास क्रांतीचे शिल्पकार झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी गुरुदेव आश्रम, नागपूर येथे 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिनी, ध्वजारोहण करताना केलेले विवेचन-
१)पाशवी शक्तीचा लेश न अंतरी घुसो, प्रेमाने समता ममता विलसो- दिसो.
२)देश हा देव ची पवित्र, कायदा हा त्याचे व्यवस्था सूत्र.
३)सेवाहीनांची पंचायत, ती गावास करील पंचाईत.
४)लोकशाही म्हणजे लोकांचे मनोगत, सिंहासनी चढावे.
लोकशाही म्हणजे लोकांचे हित, लोकांकडून व्हावे हातोहात.
सर्व मालक म्हणोनी सत्य जबाबदारी ओळखावी.
५)लोकशाहीत जो सत्ताधारी, तो मालक नव्हेची निर्धारी.
लोकशाहीचा कारभारी जबाबदारीही त्याची. - व. राष्ट्रसंततुकडोजी.
लोकशाहीत सुद्धा असलेल्या हुकुमशाहीत व दडपशाहीत या लुटारूंच्या विरोधात आवाज काढण्याची हिम्मत मात्र शेतकरी करू शकला नाही. अन्नदात्याची मुस्कटदाबी सुरू झाली.आणि आवाज केलाच तर तो सत्ताधीशांनी वरूनच फूट पाडून , किंवा चोरांच्या ग्यांगित, व सत्तेत सामील करून त्याला दाबण्याचाच प्रयत्न झाला व त्याने सुद्धा इतरांचे राहिले,सुईले वाटोळे केले.
या लुटारूच्या गळ्यात - "शेतकरी, ज्या दिवशी खेटराचे हार टाकतील,तेव्हाच हा देश शेतकऱ्यांच्या बाजूने झुकल्या शिवाय राहणार नाही "?
नेत्यांच्या गळ्यात फुलांचे हार टाकूनच, शेतकऱ्यांनी आपल्या पायावर धोंडे पाडून घेतले.आता या सर्व व्यवस्थेला आमदार-खासदार जबाबदार आहेत? यांनी शेतकरी हिताचे कोणतेही कायदे संसदेत पुन्हा दुरुस्त केले नाहीत. कारण कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना कायदे बदलण्याची गरजच वाटली नाही. सत्तेचा मलिदा टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठीच सत्ताधीशांनी असा पाया मजबूत केला . हा चुकीचा पायंडा दुरुस्त करण्याची व उखडून फेकण्याची जबाबदारीच जनतेवर येऊन ठेपली. जय हिंद. जय बळीराजा.
आपला नम्र-
धनंजय पाटील काकडे 9890368058
विदर्भ प्रमुख- शेतकरी संघटना.
मुक्काम- वडूरा, पोस्ट- शिराळा.
तालुका -चांदूरबाजार, जिल्हा- अमरावती
Share your comments