1. कृषीपीडिया

असे करा हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन, वाचेल मोठा खर्च

हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून देशात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक पेरणीचा वेग दिसतोय.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
असे करा हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन, वाचेल मोठा खर्च

असे करा हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन, वाचेल मोठा खर्च

हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून देशात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक पेरणीचा वेग दिसतोय.घाटेअळी मुळे हरभरा पिकास ३० ते ४० % नुकसान होतो. हरभऱ्याप्रमाणे घाटेअळी कापूस, ज्वारी, तूर, मका, टमाटर, शिमला मिर्ची आणि इतर कडधान्य पिकांवर आढळून येते. पुर्ण विकसीत झालेली घाटे अळी हिरवट पोपटी रंगाची असते, यात विविध रंगछटा सुध्दा आढळतात व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. 

हरभरा पिकावरील घाटेअळी ची नुकसान करण्याची पद्धत – साधारण पीक ३ आठवड्याचे झाले असता पिकांवर बारीक अळ्या दिसू लागतात.When the crop is about 3 weeks old, fine larvae appear on the crops. लहान अळ्या सुरूवातीस पानावरील आवरण खरडून खातात त्यामुळे पाने जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. नंतर अळी कळ्या व फुले कुरतडून खाते. पीक कळी फुलोरा अवस्थेत आल्यापासून अळीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. पुर्ण वाढ झालेली अळी

४ ते ५ सेमी लांब असून घाट्याला गोलाकार छिद्र करून तोंडाकडील भाग घाट्यात घालून दाणे फस्त करते . एक अळी साधारणत ३०-४० घाट्यांचे नुकसान करते.एकात्मिक नियंत्रण: आंतर पीक घेतल्यास घाटे अळी चा प्रादुर्भाव कमी होतो. लवकर पेरणी व कमी कालावधीचे वाण घ्यावे. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी त्यामुळे किडीं चे कोष वर येतील व उना मुडे नष्ट होतील किंवा पक्षी खातील. शेतात दर

हेक्टरी २० पक्षी स्थानके उभारल्यामुळे अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते. सर्वप्रथम पिकाचे निरीक्षण करावे किडीची लक्षणे आढळ्यास सुरुवातीस ५ % निंबोळी अर्काची फवारणी करणे फायदेशीर ठरेल. जास्त प्रादुर्भावाच्या काळात म्हणजेस जर घाटेअळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ अळ्या प्रती मिटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास व्यवस्थापन करावे.

जैविक नियंत्रण: घाटे अळीच्या प्रभावी व्यवस्थापनाकरीता प्रति हेक्टर एच.ए.एन.पी.व्ही. ५०० रोगग्रस् अर्क शिफारशी नुसार फवारावा. शेतात जेव्हा अळ्या प्रथम व द्वितीय अवस्थेतील असतात तेव्हा फवारणी केल्यास अतिशय प्रभावी ठरते.रासायनिक नियंत्रण: हरभऱ्यावरील घाटेअळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळी वरील प्रभावी व्यवस्थेत क्लोरेंनट्रीनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५

मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २० टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ एस. जी ३ ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. १० मि.ली. यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून करावी.

 

लेखक: पूनम ऐन. मडावी (पी. एच. डी. ची विद्यार्थिनी) madavipunam13@gmail.com, 

डॉ. ऐ. के. सदावर्ते (सहयोगी प्राध्यापक, किटकशास्त्र विभाग डॉ.पं.दे.कृ.वी, अकोला)

English Summary: By doing this management of ghaty worm on gram crop will save huge cost Published on: 20 December 2022, 06:34 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters