देशात शेती व्यवसायात काळाच्या ओघात मोठा बदल बघायला मिळत आहे. देशातील शेतकरी बांधव आता पारंपरिक पिकांची शेती करण्याऐवजी बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा देखील होत आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, देशात गेल्या अनेक वर्षांपासून बांबूची मागणीत मोठी वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन मायबाप शासन बांबू शेतीला प्रोत्साहन देत आहे. देशातील अनेक राज्य सरकारे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करून बांबू शेतीला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी बांबूची लागवड केली तर निश्चितच त्यांना यातून चांगला बक्कळ पैसा उपलब्ध होऊ शकतो.
मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, बांबूची शेती ही नापीक पडलेल्या ओसाड जमिनीवर देखील केली जाऊ शकते. याशिवाय बांबू शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यासाठी पाणी खुपच कमी लागते. अर्थातच दुष्काळी भागात देखील याची शेती केली जाऊ शकते. बांबूची एकदा लागवड केल्यानंतर सलग 50 वर्षे उत्पादन घेता येते. यामुळे बांबूची शेती शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होऊ शकते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, बांबूच्या शेतीत शेतकऱ्यांना जास्त मेहनत करावी लागत नाही. या सर्व कारणांमुळे शेतकरी बांधव देखील आता बांबू लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे.
बांबूची लागवड कशी करणार
मित्रांनो भारतात सर्वत्र बांबू लागवड करण्यासाठी अनुकूल हवामान असल्याचे सांगितले जाते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, भारतात बांबूची लागवड काश्मीरच्या खोऱ्यांचा प्रदेश वगळता इतर कुठेही केली तरी बांबूच्या शेतीतून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, आपल्या देशाचा पूर्व भाग आज बांबूचा सर्वात मोठा उत्पादक भाग म्हणुन उदयास आला आहे.
शेतकरी बांधवांना जर एक हेक्टर जमिनीवर बांबूची शेती करायची असेल तर जवळपास 1500 बांबूची झाडे एवढ्या जमिनीत सहज लावली जाऊ शकतात. बांबूचं रोप ते रोप अंतर 2.5 मीटर आणि ओळ ते ओळ अंतर 3 मीटर ठेवले पाहिजे. बांबूच्या शेतीतून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित वाणांची निवड करावी असा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, भारतात बांबूच्या जवळपास 136 जाती आहेत. या प्रजातींपैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे बांबुसा ऑरंडिनेसी, बांबुसा पॉलिमॉर्फा, किमोनोबेम्बुसा फाल्काटा, डेंड्रोकॅलॅमस स्ट्रीक्स, डेंड्रोकॅलेमस हॅमिल्टन आणि मेलोकाना बॅसीफेरा या आहेत. जुलै महिना बांबू रोपांच्या लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे सांगितले जाते. बांबूचे रोप 3 ते 4 वर्षात काढणीयोग्य होते. म्हणजेच चार वर्षात बांबूच्या शेतीपासून उत्पादन मिळवता येणे शक्य होते. जाणकार लोक सांगतात की, जर समजा शेतकरी बांधवांनी एक हेक्टर क्षेत्रात बांबूची लागवड केली तर अवघ्या चार वर्षात या एवढ्या क्षेत्रातून सुमारे चाळीस लाखांची कमाई शेतकऱ्यांना होऊ शकते. निश्चितचं बांबू शेती शेतकऱ्यांसाठी चांगलीच फायद्याची ठरणारी आहे.
Share your comments