1. बातम्या

शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन!! कांदा दरात होत असणारी पडझड पाहता शेतकऱ्यांनी छडले कमेंट्स आंदोलन; वाचा कसं आहे नेमकं हे आंदोलन

मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश असण्याचा तमगा मिरवतो, मात्र या शेतीप्रधान देशात शेतकरी बांधव नेहमीच उपेक्षित असल्याचे बघायला मिळते. देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कांद्याचे उत्पादन घेत असतात. आपल्या राज्यात कांद्याचे उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
onion rate decreased

onion rate decreased

मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश असण्याचा तमगा मिरवतो, मात्र या शेतीप्रधान देशात शेतकरी बांधव नेहमीच उपेक्षित असल्याचे बघायला मिळते. देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कांद्याचे उत्पादन घेत असतात. आपल्या राज्यात कांद्याचे उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे.

भारताच्या एकूण कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे. सध्या महाराष्ट्रात कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटत असल्याचे बघायला मिळत आहे. खरं पाहता कांदा एक नगदी पीक असून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण हे या पिकावरच अवलंबून आहे.

मात्र, असे असले तरी मायबाप शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असतो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकजूट नसल्याने तसेच मायबाप शासनाची कांद्याबाबत असलेली उदासीन धोरणे यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने एका अनोख्या आंदोलनाची पायाभरणी केली आहे. कांदा उत्पादक संघटनेने उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कमेंट आंदोलन सुरु केले आहे.

Aadhar Card: एका मिनिटात बदला आधार कार्डवरचा पत्ता, मोबाईल नंबर आणि फोटो; जाणून घ्‍या संपूर्ण प्रोसेस

गेल्या अडीच महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण बघायला मिळत आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. नाफेड देखील कांद्याला अतिशय कवडीमोल दरात खरेदी करीत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा चुना लागतं आहे. सध्या कांद्याला शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढाचं दर मिळतं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, सध्या मिळत असलेल्या या कवडीमोल दरात उत्पादनखर्च काढणे देखील अशक्य आहे.

परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात आत्महत्या देखील केल्या आहेत. मात्र असे असतानाही सरकारचे उदासीन धोरण कायम आहे. हेच कारण आहे की महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने मायबाप शासनाचे तसेच सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या आंदोलनाची पायाभरणी केली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी माहिती दिली.

Business Idea: तुमच्या कामासोबत सुरु करा 'हे' व्यवसाय; मिळणार अधिक पैसा; वाचा याविषयी सविस्तर

असं राहणार आहे आंदोलनाचे स्वरूप

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने सुरु केलेल्या कमेंट्स आंदोलन बाबत अधिक माहिती अशी की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या व्हिडिओज व मेसेज च्या खाली कमेंट बॉक्समध्ये कांद्याला तात्काळ तीन हजार रुपये प्रति क्‍विंटल असा दर द्या अशी मागणी करायची आहे. सदरची मागणी ही मराठी हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेत कांदा उत्पादकांनी करावी असे आवाहन देखील यावेळी संघटनेकडून करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्री पर्यंत आणि विरोधी पक्षनेते पासून ते आजी-माजी सर्व आमदार खासदारांच्या व्हिडिओज व मेसेज च्या खाली कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देण्याची मागणी असे आवाहन कांदा उत्पादक संघटनेने केले आहे. निश्चितच हे अनोखे आंदोलन शेतकऱ्यांच्या फलश्रुतीस खरे उतरते की नाही हे पाहण्यासारखे राहिलं.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी 50 हजारांची मदत; वाचा याविषयी

English Summary: Unique agitation of farmers !! Farmers protest against onion prices Read exactly how this movement is Published on: 23 May 2022, 02:50 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters