बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण आणते बोर्डो मिश्रण; वाचा बनवण्याची पद्धत

14 July 2020 06:13 PM

 

हवेत ओलावा असला तर बुरशी हवेत राहणारे बिजाणून सोडते. जे वेलींच्या किंवा पिकांच्या जमिनीकडील पानांना संक्रमित करतात. हवेत जास्त आद्रता असते तेव्हा वाढतात बुरशीजन्य रोग वाढू लागतात.यामुळे नवीन पेरलेल्या बियांना धोका असतो. अशा बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोर्डो मिश्रण हे खूप उपयोगी आहे. प्रा. पी. ए. मिलार्डेट

यांनी सन 1882मध्ये द्राक्ष्यावरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी फ्रान्स मध्ये याचा वापर केला. महाराष्ट्रात फळबागा, भाजीपाला इत्यादीवर बुरशीजन्य रोगाच्या निवारण्यासाठी याचा वापर करतात. आज आपल्या लेखा बोर्डो मिश्रण कसे तयार केले जाते, कशापद्धतीने याचा वापर केला जातो याविषयी जाणून घेणार आहोत.  

कसे तयार करणार बोर्डो मिश्रण

 • बोर्डो मिश्रण तयार करताना धातूच्या भांड्याचा वापर करू नये.
 • मिश्रणाचे द्रावण फवारणीपर्यंत प्लास्टिक ड्रममध्ये साठवावे.
 • दोन अलग द्रावणे मिसळताना थंड करावीत.
 • पावसाळ्यात जर फवारणी करायची असेल तर स्टिकर सोबत फवारणी करावी.
 • द्रावणासाठी स्वच्छ पाणी वापरावे.
 • क्षारयुक्त पाणी वापरू नये.
 • विरी गेलेला चुना वापरू नये.
 • मिश्रण ढवळायला लाकडी किंवा प्लास्टिक काठीचा वापर करावा.

    बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत -

 • 1किलो कळीचा चुना घ्यावा.  
 • 1 किलो मोरचूद घ्यावे
 • चुन्याची निवळी व मोरचूदचे द्रावण वेगवेगळ्या धातुविरहित भांड्यात बनवावे.
 • दोन्ही द्रावणे एकत्र करण्यासाठी प्लास्टिक किंवा सिमेंट टाकीचा वापर करावा.
 • प्रथम चुन्याची निवळी गाळून स्वतंत्र भांड्यात ठेवावी.
 • दोन्ही द्रावणे एकत्र मिसळताना द्रावणे सारखी ढवळत राहावे (मिश्रणाचा सामू उदासीन म्हणजे 7.5असणे गरजेचे आहे )
 • दोन्ही द्रावणे एकत्र मिसळताना तिसऱ्या काठीचा वापर करावा.

मिश्रणात जास्त मोरचूद असल्यास कोवळ्या पिकांना अपाय होतो. म्हणुन मिश्रणाची तपासणी करण्यासाठी निळा लिटमस पेपरचा वापर करावा. लिटमस पेपर द्रावणात बुडवल्यानंतर पेपरचा रंग जर लाल झाला तर मिश्रणात अधिक मोरचूद असून ते आमलधर्मी म्हणजे फवारणीस अयोग्य समजावे. त्यावेळी मिश्रणात थोडी थोडी चुन्याची निवळी घालून पेपर निळा होईपर्यत ढवळावे.

 रोग नियंत्रकासाठी वापर 

 • आंब्यावरील करपा -आंब्यावर जर करपा रोगाचा प्रादुर्भाव असेल तर 0.8 टक्के द्रावण पावसाळा सुरु होण्यापूर्वी फवारावे आणि जून ते ऑगस्ट पर्यंत 4 फवारण्या कराव्या.
 • केळी पानावरील ठिपके -0.8 टक्के द्रावणाची जून ते ऑगस्ट पर्यंत 2-3 वेळा फवारणी करावी.
 • डाळींबावरील काळे डाग -0.8द्रावण बहार धरल्यानंतर नवीन फुटीवर 1-2 फवारे व काढणीपर्यंत 3-4फवारे करावे
 • खोडावरील काळे डाग -1 टक्के द्रावणाने फवारणी करावी
 • फळांवरील काळे डाग -1 टक्के द्रावणाने फवारणी करावी.
 • लिंबूमधील शेंडेमर या रोगासाठी 1 टक्के द्रावण वर्षातून 2-4 वेळा फवारणी करावी. जेव्हा फळे सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर पुढे 3-4 फवारण्या कराव्यात.
 • बुरशीमुळे होणारी मूळकूज, खोडकूज, मर, इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण 1 टक्के हे उत्तम बुरशीनाशक आहे.

लेखक 

रत्नाकर पाटील- देसले 

Bordo mixture Bordo mixture control crop fungus fungus agripedia कृषीपीडिया बोर्डो मिश्रण बुरशीवर नियंत्रण आणते बोर्डो मिश्रण बुरशी बुरशीजन्य रोग
English Summary: Bordo mixture control crop fungus; Read the making detail 14 july

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.