1. कृषीपीडिया

स्फुरदयुक्त (DAP/SSP) रासायनिक खतां पेक्षा 'हाड-मासांचे खत' अत्यंत प्रभावी व परिणामकारक

संत्रा/मोसंबी बागायतदारां पासुन कोरडवाहू शेतकऱ्यां पर्यंत फॉस्फेट (दाणेदार)

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
स्फुरदयुक्त (DAP/SSP) रासायनिक खतां पेक्षा 'हाड-मासांचे खत' अत्यंत प्रभावी व परिणामकारक

स्फुरदयुक्त (DAP/SSP) रासायनिक खतां पेक्षा 'हाड-मासांचे खत' अत्यंत प्रभावी व परिणामकारक

संत्रा/मोसंबी बागायतदारां पासुन कोरडवाहू शेतकऱ्यां पर्यंत फॉस्फेट (दाणेदार) खताचा अत्यधिक वापर प्रत्येकच पीकांसाठी शेतीमध्ये केला जातो. डी.ए.पी./सुपर फॉस्फेट या स्फुरद युक्त खतांचा अत्यधिक वापर करून सुद्धा स्फुरदाची (फॉस्फरस) कमतरता फळे व झाडावर दिसून येतेच. असे होण्यामागचे नेमके कारण काय?नजीकच्या बर्‍याच संशोधनात हे निष्पन्न झालेले आहे कि रासायनिक स्फुरद (फॉस्फेट) युक्त खतांचा

शेतीतील वापर निरर्थक ठरत आहे.त्यामागील मुख्य कारण म्हणजे प्रत्येकच शेत जमीनीचा ७.५ च्या समोर गेलेला सामू(PH) आणि जमीनीतील सेंद्रिय म्हणजेच कुजनार्या खतांची कमतरता.

देशातील 10 लाख रेशनकार्ड होणार रद्द - पहा कोणत्या लोकांना मिळणार नाही मोफत धान्य

जमिनीचा सामू(PH) जेंव्हा ६-७.५ च्या दरम्यान असतो त्यावेळेसच स्फुरद युक्त रासायनिक खताद्वारे देण्यात आलेले फॉस्फरस पीकांना मीळू शकते.Phosphorus supplied by chemical fertilizers containing phosphorus can be absorbed by crops. आपल्या भागातील कोणत्याच जमीनीचा सामू (PH) आता ७.५-८ च्या खालचा नाही. तेंव्हा

आपण पोत्यांनी शेतात ओतत असलेल्या "सुपर फॉस्फेट" चे किती मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण (stabilization) होवून माती कनांना फॉस्फरस चिकटून बसतो आणि पीकांना त्याचा काहीच उपयोग होत नाही.अशा परिस्थितीत काही तज्ञ महाभाग कृत्रिम रित्या तयार केलेले भाडोत्री 'PSB' जीवाणू जमिनीत सोडण्याचा अफलातून सल्ला देतात. असे लॅबमधले PSB जीवाणू कितीही जमिनीत सोडले तरी ते सेंद्रिय म्हणजेच कुजणार्या पदार्थांवरच जगू शकतात. हे

आपणास व्यापारी उद्देश असल्या कारणाने हेतू पुरस्सरच सांगण्यात येत नाही.म्हणुनच आजमितीस स्फुरद (फॉस्फेट) युक्त खते बगीच्यात किंवा शेतीत टाकुन सुद्धा संत्रा/मोसंबी फळांची साइज, बट्टिदार फळे, चोपडी साल, गोडवा, आकर्षक रंग व टिकाऊ क्षमता अश्या गुणवत्तापूर्ण फळांच्या बाबतीत आपण कोसो दुर जात आहोत.त्याबरोबरच कडधान्य पीकांच्या शेतीतील मर रोग, मुळकूज व तुर उभाळण्या सारख्या रोगराईस प्रतीकारक क्षमतेची निर्मिती होते. 

 

संकलन:- पंकज काळे (M.Sc.Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती

संपर्क:- ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११

English Summary: 'Bone-fish manure' is more effective and efficient than chemical fertilizers containing phosphorus (DAP/SSP) Published on: 11 November 2022, 08:34 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters