बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांमध्ये सुद्धा शेतामध्ये नवनवीन प्रयोगकरण्या याबाबतीत खूप उत्साह दिसून येत आहे. जास्त उत्पन्नासाठी शेतकरी असे नवनवीन प्रयोग करीत आहेत. यादृष्टीने शेतकरी वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या जातींची लागवड करताना दिसत आहेत. आपल्या भारतात सगळ्यात प्रमुख पीक असेल ते म्हणजे गहू.या गव्हाच्या जातीमध्ये काळ्यागव्हाचीशेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. सध्या शेतकऱ्यांचा कल देखील याकडे वळताना दिसत आहे.
सध्या काही शेतकऱ्यांना द्वारे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने काळ्यागव्हाची शेती करण्याची सुरुवात केली आहे. या गव्हाचे उत्पादन सामान्य गव्हा सारखेच येते तसेच उत्पादनसुद्धा साध्या गव्हासारखेच येते. परंतु या जातीच्या गावांमध्ये औषधी गुणधर्म जास्त असतात.म्हणून बाजारामध्ये या गव्हाची मागणी जास्त आहे.
सामान्य गव्हाच्या तुलनेत काळ्या गहुचे मिळणारे फायदे
हा गहू दिसायला काळा रंगाचा असतो. परंतु याच्यातले गुणधर्म हे सामान्य गव्हापेक्षा जास्त असतात. या गव्हामध्ये अँथोसायनिन पिगमेंट ची मात्रा जास्त असल्यामुळे या गव्हाचा रंग काळा असतो. सामान्य गव्हामध्ये अँथोसायनिन ची मात्रा पाच ते पंधरा पीपीएम इतके असते. त्या तुलनेत काळ्या गव्हामध्ये ही मात्रा 40 ते 140 पीपीएम असते.
हा गहू वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी गुणांनी युक्त आहे. याच्यात असलेले अँथोसायनिन एक नॅचरल अँटिबायोटिक अँटीअक्सिडेंट आहे.जे हार्ट अटॅक,कॅन्सर, डायबिटीज, मानसिक ताणतणाव,गुडघ्यातील दुखणे, ॲनिमिया या सारख्या रोगांवर रामबाण उपयोगी आहे. हा गहू सामान्य गव्हापेक्षा चवीला थोडा वेगळा असतो.
या गावाचे लागवड कोणत्या वेळी करावी?
सामान्य गव्हा सारखीच एक काळ्या गव्हाची लागवड केली जाते. आपल्याला माहिती आहे की गव्हाची लागवड रब्बी हंगामात प्रामुख्याने केली जाते. त्यानुसारचकाळ्यागव्हाची लागवड देखील रब्बी हंगामात केली जाते. या गव्हाच्या लागवडीसाठी नोव्हेंबर महिना उपयुक्त आहे. या काळात शेतांमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा असतो जो या गव्हासाठी फायदेशीर आहे. नोव्हेंबर नंतर जर लागवड केली तर उत्पन्नात घट येऊ शकते.
लागवड करताना खतांचा वापर
शेताची मशागत करताना झिंक आणि युरिया टाकावा तसेच डीएपी खत ड्रिलद्वारे द्यावे. लागवडीच्या वेळेस 50 किलो डीएपी, 45 किलो युरिया, 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश तसेच दहा किलो झिंक सल्फेट प्रति एकर द्यावे.
सिंचन पद्धत
काळ्या गव्हाच्या पिकासाठी पहिली पाण्याची पाळी जवळ जवळ तीन आजच्या नंतर द्यावी. जमिनीतील ओलाव्याचे परिस्थिती पाहून पाण्याच्या पाळ्या द्याव्या. वाढ अवस्थेत तसेच गव्हाची ओंबीयेते अशावेळेस, दाना दुधात असतो अशा वेळेस पाण्याचा ताण सहसा पडू देऊ नयेत.
नॅशनल ॲग्री फॉर बाय टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट नाबीने विकसित केलेल्या काळ्यागव्हाच्या नवीन प्रजाती
सात वर्षाच्या संशोधनानंतर काळा गव्हाच्या नवीन प्रजातींना पंजाब मधील मोहाली येथे असणाऱ्या नेशनल एग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट नाबी ने विकसित केले आहेत. या संस्थेकडे या जातींचे पेटंट सुद्धा आहे. या गव्हाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा रंग काळा असतो. परंतु याच्या येणाऱ्या ओंब्या या सामान्य गव्हासारख्या हिरव्या असतात.
नाबी या संस्थेचे सायंटिस्ट तसेच काळा गहू प्रोजेक्ट चा हेड डॉ. मोनिका गर्ग यांच्यानुसार नाबी ने काळा गावा सोबत निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या जाती विकसित केल्या आहेत. तसेच या संस्थेने शेतकऱ्यांना या गव्हाचे बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी बऱ्याच कंपन्यांसोबत करार केला आहे. शेतकरी या कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमध्ये उपलब्धतेनुसार गव्हाचे बियाणे खरेदी करू शकतात.
काळ्या गव्हाची शेती ही देशांमध्ये नवीन आहे त्यामुळे देशात काही निवडक शेतकरी याची शेती करतात. त्यामुळे या गव्हाचे बियाणे बाजारांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होत नाही. ज्या शेतकऱ्यांना काळ्या गव्हाची शेती करायची आहे.असे शेतकरी 6267086404 या नंबर वर संपर्क करून या गव्हाचे बियाणे खरेदी करू शकतात. ( स्त्रोत- किसान समाधान)
Share your comments