1. कृषीपीडिया

पक्षी किटक व्यवस्थापणामध्ये कशी मदत करतात?

पक्षी म्हटलं की चिमणी,मैना,कावळा,बुलबुल असे अनेक छोटे-मोठे पक्षी डोळ्यासमोर येतात. रब्बी हंगामात पीक जेव्हा काढणीला येते,जसे ज्वारी, तेव्हा पिकामध्ये पक्ष्यांचा भरपूर त्रास जाणवतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पक्षी किटक व्यवस्थापणामध्ये कशी मदत करतात?

पक्षी किटक व्यवस्थापणामध्ये कशी मदत करतात?

पण हेच काही काळ त्रासदायक वाटणारे पक्षी आपल्या शेताचे अप्रत्यक्षपणे किड नियंत्रित ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतात.

    विविध पिकामध्ये कीटकांच्या अळी अवस्थाच त्रासदायक होत असतात. त्या अळ्या तसेच इतर कीटक विविध पक्ष्यांकडून फस्त केले जातात. 

    पक्ष्याचा कीड व्यवस्थापणातील सहभाग उन्हाळ्यातील नांगरणीच्या वेळेपासून सुरू होतो. वर्षभर पीक घेतल्यानंतर जमिनीस विश्रांती म्हणून आपण नांगरणी करून घेतो

नांगरणी करताना मातीतील किडीच्या पालापाचोळ्यातील कीटक,कोष्यावस्था बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष्य बनतात.आता यासाठी काही वेगळं शेतकऱ्याला करावं लागत नाही. हे पक्षी पीक लागवडीनंतर शेतामध्ये आमंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी 'T' आकाराचे पक्षीथांबे उभे करू शकतो. जेने करून पक्षी आपल्या पिकामध्ये येतील आणि कीड नियंत्रण होईल. सर्व पिकामध्ये आपण पक्षी थांबे लावू शकतो. 

पक्ष्यांच्या सहकार्याने किमान 30 ते 40 % कीड ही नैसर्गिकरित्याच कमी होऊन जाते. ज्या मुळे कीटकांची/किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीवर जाऊ शकत नाही.

    कीड निर्मुलनासाठी जहाल कीटकनाशकांऐवजी/ सौम्य व जैविक किटकाशके वापरू शकतो. त्यामुळे किडीमध्ये कीटकनाशक प्रतिरोधक क्षमता तयार होत नाही

पक्ष्यांच्या या नैसर्गिक वागणूकीमुळे ते एकात्मिक कीड व्यवस्थापनातील महत्वाचे घटक ठरतात.

    

संकलन - हरीश लेंडे,अमरावती

सचित काळदाते,वाशीम

IPM school team

 

English Summary: birds how to help the management of insect and pest Published on: 29 September 2021, 11:19 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters