मसाला म्हटलं म्हणजे चटकन डोळ्यासमोर येते ती तिखट मिरची. मिरचीच्या बाजारपेठेचे एक गणित असते ते म्हणजे मिरची जितकी तिखट असते तेवढी तिला बाजारात मागणी आणि भाव देखील जास्त मिळतो.
अशाचप्रकारचे एक मिरची आहे तिला इंग्रजी मध्ये बर्ड हाय मिरची म्हणजेच चिली असे म्हणतात. अतिशय तिखट असून बाजार तिला चांगली मागणी असते. ओल्या मिरचीच्या लागवडीच्या माध्यमातून शेतकरीचांगले उत्पन्न मिळवून श्रीमंत होऊ शकतात.जर या मिरचीच्या बाजार भाव आजचा विचार केला तर ते 250 रुपये प्रतिकिलो दरापर्यंत विकली जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही झाडाला उलटी लागते. या लेखात आपण या मिरचीच्या लागवड पद्धती विषयी जाणून घेऊ.
बर्ड आय चिलीची लागवड पद्धत
बर्ड चिली अर्थात उलटी मिरचीची लागवड भारतामध्ये प्रामुख्याने आसाम, मेघालय आणि केरळ राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. तशीही मिरची अतिशय तिखट असून झाडाला उलटी लागते. यामध्ये भूत ढोलकियाहा एक मिरचीचा प्रकार असून ती तिच्या तीव्र चवीसाठी ओळखली जाते. तसेच उलटी नावाची मिरची टिकाऊ तर असतेस परंतु प्रचंड उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
या मिरची एकरी रोपांची संख्येचा विचार केलालाल मिरची जातीच्या बर्ड आय मिरचीची प्रत्येक 22 हजार रोपे लावावे. लागवड करताना मिरचीचे अंतर 30 बाय 30 सेंटिमीटर असावे. एका एकराचा विचार केला तर यामध्ये दोन टन अपेक्षित असते व बाजार भाव 250 रुपये प्रति किलो मिळतो. हे गणित जर पाहिले तर एका एकरातून दरवर्षी अडीच लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.
लागवड कालावधी
या मिरचीची लागवड पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात तसेच शरद ऋतूत देखील करता येते. पावसाळ्यात लागवड करायची असेल तर जून किंवा जुलै महिन्यात करावी व शरद ऋतूत लागवड करायची असेल तर सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये करावी आणि उन्हाळी हंगामात लागवड करायची असेल तर ती फेब्रुवारी आणि मार्चमध्ये करावी.
लागवड करण्याच्या आधी रोपांची मुळे मायक्रो रायझा पाच मिलि प्रति लिटर द्रावणात मुळामध्ये मिसळावे.
या मिरचीच्या सुधारित जाती
काशी अनमोल, काशी विश्वनाथ, जवाहर मिरची 283, जवाहर मिर्च 218, अर्का सुफल, काशी अर्ली, काशी सुर्ख, काशी हरिता या प्रमुख सुधारित जाती आहेत.
( साभार-कृषीयोजना)
Share your comments