ट्रायकोडर्मा एक बुरशी जी इतर बुरशीना खाते. उपयोग:- करपा , भुरी,डाऊनी,जमीनीतून येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम .
स्युडोमनास: एक जिवाणू जो इतर बुरशीना खातो. उपयोग:- करपा,भुरी,डाऊनी,जमिनीतून येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम.
अँपिलोमयसिंन:- एक बुरशी जी इतर बुरशींना खाते. उपयोग:- करपा,भुरी सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशींकरीता उत्तम.
बॅसिलस सबटीलस:- एक जिवाणू जो इतर बुरशींना खातो. उपयोग:- करपा,डाऊनी,सर्व पिकांवर येणाऱ्या बुरशींकरिता उत्तम.
बॅसिलस थ्यूरेणजेनेसीस :- हे अळी ने खाल्ले की तिला तोंडाचा पक्षवात होतो.तिचे खाने बंद होऊन 72 तासात मरते. बाजारात डायपेल-8,डेल्फिन,हाॅल्ड या नावाने उपलब्ध आहे.
ब्युव्हेरिया बेसियाना:- एक बुरशी जी रसशोषक किडींवर जगते आणि त्यांना मारते. उपयोग:- मावा,तुडतूडे ,मिलीबग करीता उत्तम.
मेटारायझम अनिसपोली:- एक बुरशी जी अळीवर्गीय किडींवर जगते आणि त्यांना मारते. उपयोग:- सर्व प्रकारची अळी विशेष करून हुमणी अळी.
वेस्टडीकम्पोजर:- तीन जिवाणू जे सडवण्याची प्रक्रिया वेगात करतात, बहुउपयोगी आहे.
रायझोबियम:- हे जिवाणू द्विदलवर्गिय कडधान्ये,तेलबिया यांच्या मुळींवर गाठी करून राहतात व हवेतील नायट्रोजन पिकांना उपलब्ध करून देतात.
अझोटोबॅक्टर व अँझोस्प्रिलम:- हे जिवाणू एकदल पिकांच्या मुळींजवळ राहून हवेतील नायट्रोजन पिकांना उपलब्ध करून देतात.
PSB:- हे जिवाणू जमिनीतील स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.
KSB:- हे जिवाणू जमिनीतील पालाश पिकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.
KSB:- हे जिवाणू जमिनीतील पालाश पिकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगात करतात.
माईकोरायझा बुरशी (वैम HD)
पपई,केळी,मिरची,हळद,ऊस,सोयाबीन,कापूस,संत्रा,अद्रक अश्या पिकांची लागवड करत असाल किंवा केली असेल तर या पिकांसाठी अतिशय उपयुक्त अश्या माईकोरायझा बुरशी चा वापर करा व उत्पादनात वाढ करा.
Share your comments