1. कृषीपीडिया

बीज व रोप संस्कारासाठी उपयुक्त आहे बीजामृत, अशा पद्धतीने तयार करू शकतो घरच्या घरी

सध्या रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून उत्पादन खर्चात वाढ होत आहे जर शेतीमधून शाश्वीत उत्पादन घ्यायचे असेल तर शेतकऱ्यांना सेंद्रिय किंवा जैविक शेतीकडेवळण्या शिवाय पर्याय नाही

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
bijaamrut

bijaamrut

सध्या रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून उत्पादन खर्चात वाढ होत आहे जर शेतीमधून शाश्‍वत उत्पादन घ्यायचे असेल तर शेतकऱ्यांना सेंद्रिय किंवा जैविक शेतीकडेवळण्या शिवाय पर्याय नाही

सेंद्रिय पद्धतीच्या शेतीमध्ये शेतीला लागणाऱ्या निविष्ठा स्वतच शेतातच,गावातच तयार करता येतात. या सेंद्रिय पद्धतीमुळे मातीमधील सूक्ष्मजीवांच्या संख्येत वाढ होऊन माती सुपीक होते.या लेखात आपण पिकांना उपयुक्त अशा बीजामृत या द्रवरूप खताचे फायदे आणि बनवण्याची पद्धत याविषयी माहिती घेणार आहोत.

बीजामृतचेफायदे

 बियाणे पेरणी किंवा रोपे लावण्यापूर्वी बीज व रोप संस्कार द्वारे त्यांची उगवण क्षमता वाढवणे गरजेचे असते. या प्रक्रियेमुळे जमिनीतून पिकांना होणाऱ्या रोग संक्रमणाला सेंद्रिय पद्धतीने अटकाव करणे शक्य होते.

बीजामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 वीस लिटर पाणी, देशी गायीचे ताजे शेण एक किलो, एक लिटर गोमूत्र, एक लिटर दही, 50 ग्रॅम कळीचा चुना,हिंग 10 ग्रम, एक पिंप, उपलब्ध जिवाणूसंवर्धक  ( ट्रायकोडर्मा ),संबंधित पिकाच्यामुळातील माती

बीजामृत बनवण्याची कार्यपद्धती

 वरील सर्व साहित्याचे मिश्रण करून पिंपातील पाण्यात टाकून चांगले ढवळावे. हे बीजामृत रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी काडीने चांगले ढवळून बियाण्यांच्या बीज संस्कारासाठी वापरावे.

 

अशा पद्धतीने करावा बीजामृतचा वापर

1-पिकांचे व भाजीपाल्याचे बियाणे जमिनीवर किंवा गोणपाटावर पसरावे. त्यावर बीजामृत शिंपडावे व हाताने बी वरखाली करावे.बियांवर बिजामृताचे अस्तर चढेल. बी सावलीत सुकवून पेरावे.

2- लागवडीअगोदर भाजीपाल्यांची, फळझाडांची रोपे लावण्यापूर्वी त्याच्या मूळ्याबीजामृताच्या द्रावणात पाच मिनिटे बुडवून लागवड करावी. द्राक्ष किंवा डाळिंबाच्या हुंड्या बीजामृतातबुडवून लावाव्यात.

English Summary: bijaamrut is useful for vegetable crop and orchard plant Published on: 28 October 2021, 02:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters