गाळ शेतामध्ये टाकणे हे शेतकरी बंधूंसाठी काही नवीन नाही. उन्हाळ्यामध्ये धरणांचे पाणी किंवा एखाद्या तलावातील पाणी कमी झाले तर शेतकरी अशा ठिकाणच्या गाळ मोठ्या प्रमाणात शेतात टाकतात.गाळ टाकने हे मातीच्या सुपीकतेसाठी खूप महत्त्वपूर्ण असून गाळ भरघोस उत्पादनासाठी सुद्धा फायदेशीर आहे.
गाळ मातीत विविध प्रकारचे सेंद्रिय पदार्थ नैसर्गिक अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शेतीला याचा खूप चांगला फायदा होतो. या लेखामध्ये आपण गाळ टाकताना घ्यायची काळजी व कोणता गाळ टाकू नये या बद्दलचे महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊ.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो चांगल्या उत्पादनासाठी 'या' खताचा करा वापर; होणार लाखोंमध्ये कमाई
ही काळजी महत्त्वपूर्ण
1- तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये गाळ माती टाकायचे असेल तर ती मार्च ते मे या महिन्यांमध्ये जमीन जेव्हा कोरडी पडते तेव्हा साठवण पद्धतीने गाळ काढून शेतात पसरवून घ्यावा.
2- समजा तुम्हाला ज्या शेतांमध्ये गाळ टाकायचा आहे व त्या ठिकाणी तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल तर गाळ टाकताना तो खड्डा खोदून टाकावा किंवा शेताचा उतारा ज्या दिशेस असेल त्यानुसार चर खोदून त्यामध्ये गाळ माती टाकावी.
3- हलक्या व जमिनीची पाणीधारण क्षमता कमी आहे अशा जमिनीमध्ये गाळ टाकावा.
4- जमिनीतील चिकन मातीच्या प्रकारानुसार गाळ मातीचे प्रमाण ठरवावे.
या प्रकारचा गाळ शेतात टाकू नये
1- तुम्ही जो काही काळ टाकणारा त्याचा सामू साडेआठ पेक्षा जास्त नसावा. परंतु तो जास्त असेल तर अशा मातीचा उपयोग करू नये.
2- चुनखडी मिश्रित गाळमाती शेतासाठी वापरू नये. कारण अशा प्रकारच्या मातीचा जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर विपरीत परिणाम होतो व पिकांच्या उत्पादकतेत घट येते.
3- गाळ माती ही योग्य प्रमाणात वापरणे महत्त्वाचे ठरते. नाहीतर त्याचा उपयोग होण्याऐवजी नुकसानच होण्याचा धोका संभवतो.
4- गाळ टाकण्याअगोदर जमिनीचा प्रकार तसेच संबंधित जमिनीचा सामू व त्या जमिनीची रासायनिक व भौतिक गुणधर्म इत्यादी गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे.
नक्की वाचा:Fertilizer: कोंबडी खताचा 'अशा' पद्धतीने कराल वापर तर पिकांना ठरेल वरदान, येईल पीक जोमदार
फायदे
1- तलावांमध्ये किंवा धरणांमध्ये जो काही गाळ जमा होतो, त्यामध्ये अन्नद्रव्य आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिकांना त्याचा फायदा होतो.
2- त्यांच्या निरोगी वाढीसाठी व चांगल्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून गाळमाती खूप फायद्याचे ठरते.
3- जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता म्हणजे धारणक्षमता जर कमी असेल तर अशा जमिनीत गाळ टाकल्यामुळे संबंधित जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
4- समजा तुम्ही ज्या जमिनीत गाळ टाकणार आहात ती जमीन जर हलकी व मध्यम असेल तर अशा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी व पिक उत्पादन चांगले येण्यासाठी गाळ मातीचा खूप उपयोग होतो.
5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गाळ टाकल्यामुळे जमिनीतील स्फुरद, सेंद्रिय कर्ब व पालाश इत्यादी महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते व पिकांचे उत्पादन खूप चांगले येते.
नक्की वाचा:या फळझाडांच्या लागवडीतून मिळेल बक्कळ पैसा! काही वर्षांतच व्हाल श्रीमंत
Share your comments