शेतीमध्ये नियंत्रित शेतीला खूप महत्त्व आहे. उत्पादन आणि ग्राहक या जागतिक मूल्य साखळी मधील सर्वात महत्त्वाचे बदल होणार असतील तर नियंत्रित शेतीचे वाढणारे प्रमाण वाढणार आहे.हे तंत्रज्ञान समजून घेणे फार गरजेचे आहे.
संरक्षित आणि नियंत्रित शेतीत ग्रीन हाऊस, शेडनेट, व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक आणि एरोपोनिक अशा विविध पद्धतीचा समावेश होतो.या शेतीमध्ये कुशल असे कामगार तसेच नियंत्रित शेतीला लागणारी साधने तसेच तंत्रज्ञान यांची गरज भासणार आहे. तसेच पिकांसाठी लागणारे सुयोग्य हवामान व वातावरण याची माहिती असणे आवश्यक असते. जर आपण पूर्ण वर्षाचा विचार केला तर वेगवेगळ्या हंगामांमध्ये पिकांना हवे तसे वातावरण मिळत नाही. त्यामुळे नियंत्रित शेती पद्धती पैकी योग्य पद्धतीची निवड करून तसे वातावरण तयार करता येऊ शकते. त्यातून पिकांच्या उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल.
नियंत्रित शेती मधील संधी
कोरोणा काळात आणि कोरोना नंतरच्या काळात शेतकरी हे युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात केल्या जाणाऱ्या शेती पद्धतीचा विचार करू लागला आहे.
नुसता विचारच नाही तर पुणे मुंबईसारख्या आणि नाशिक शहरालगत अशा काय शेतीचा प्रयत्न शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. नैसर्गिक पद्धतीने हायड्रोपोनिक शेती किंवा भाजीपाला पिकवण्याचा विचार आपल्यासाठी फार काही नवीन नाही. ईशान्य भारतामध्ये किंवा पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यालगत शेतकरी अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचा कुटुंबाला पुरेल एवढा भाजीपाला पिकवित आहेत. सन 2012 च्या तीव्र दुष्काळामध्ये कोकणात आणि महाराष्ट्रात आणि अन्य ठिकाणी हायड्रोपोनिक पद्धतीने जनावरांसाठी चाऱ्याची उत्पादन घेण्यात आले आहे. संरक्षित शेती मध्ये आपण कमीत कमी खर्चात शेताच्या चारही बाजूने कीटक प्रतिरोधक जाळी आणि अतिनील किरण रोधक फिल्मचेपडदे लावून चांगला फायदा मिळू शकतो. यामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. एवढेच नाही तर जोरदार वाऱ्यांच्या झोतापासून देखील चांगले संरक्षण मिळते. याच बरोबर रात्रीचे कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी देखील त्याचा फायदा मिळू शकतो.
नियंत्रित वातावरणातील शेतीचे फायदे
- पिकाला आवश्यकते प्रमाणे वातावरणनिर्मिती केल्यामुळे हरितगृहे वाशेडनेटगृहाचे अनेक फायदेदिसूनयेतात.
- पिकांसाठी आवश्यक असणारे वातावरण निर्मिती यांच्या माध्यमातून करता येऊ शकते.
- पिकांच्या उत्पादनामध्ये आणि दर्जा यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊन चांगल्या गुणवत्तेमुळे बाजार भाव देखील चांगला मिळतो.
- बाजारपेठेत मागणी चांगली राहून त्या मागणी नृप नियोजन केले तर वर्षभर फळ भाजी व फुले यांचा पुरवठा करता येऊ शकतो.
- कृषी निविष्ठांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे शक्य होते तसेच कमीत कमी निविष्ठांचा वापर करता येतो.
- पाण्याच्या वापरामध्ये 90 टक्क्यांपर्यंत लक्षणे बचत होते.
- कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी होतो किंवा त्याला मोठ्या प्रमाणातअटकाव होतो.
- पिकाचे अतिशय कमी तापमान, वारा, गारठा, बर्फ आणि पक्षी व कीटक यांच्यापासून संरक्षण होते.
- कमीत कमी पाणी व कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न मिळण्याची संधी प्राप्त होते.
- उच्च दर्जाची फळे व भाजीपाला या बरोबरच वजन, रंग व स्वाद वाढल्यामुळे बाजारामध्ये चांगला भाव मिळतो.
Share your comments