1. कृषीपीडिया

फायद्यात राहाल, अशी करा विहीर पुनर्भरणाची प्रक्रिया

जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे भिन्न थर आढळतात. या थरांची जाडी, आकारमान वेगवेगळे आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
फायद्यात राहाल, विहीर पुनर्भरणाची प्रक्रिया

फायद्यात राहाल, विहीर पुनर्भरणाची प्रक्रिया

जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे भिन्न थर आढळतात. या थरांची जाडी, आकारमान वेगवेगळे आहे. पहिला थर मातीचा असून, या थरातून पाणी मुरण्याचा वेग हा दर दिवसाला साधारणपणे दोन सें.मी. असतो. 

मुरमाच्या थरातून पाणी वाहण्याचा दर दहा सें.मी. असू शकतो. त्या खडकांना भेगा, फटी, सळ व सूक्ष्म छिद्रे असतात. त्या खडकातून पाणी वाहण्याचा दर हा २०० सें.मी. एवढासुद्धा असू शकतो. या सर्वांचा एकत्रितपणे विचार केला असता पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजल साठ्यापर्यंत पोचण्यास साधारणपणे एक महिना किंवा जास्त कालावधी लागतो. म्हणजेच नैसर्गिक भूजल भरणाचा वेग फार कमी आहे, हे दिसून येते. 

विहीर पुनर्भरण करताना विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये १० फूट लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत. विहिरीपासून पहिला खड्डा १० फूट लांब, १० फूट रुंद व १० फूट खोल घ्यावा. या खड्ड्याच्या तळाशी एक आडवे छिद्र घेऊन चार इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे हा खड्डा विहिरीशी जोडावा. या खड्ड्याच्या तळाशी २.५ फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा. त्या थरावर २.५ फूट जाडीचा थर भरावा. त्यानंतर २.५ फूट जाडीचा वाळूचा चाळ (चाळलेली वाळू) भरून त्या थरावर धुतलेल्या वाळूचा २.५ जाडीचा थर भरून घ्यावा. 

पहिल्या खड्ड्यापासून साधारणपणे ३.५ फूट अंतरावर पुन्हा १० फूट लांब, १० फूट रुंद व ३ फूट खोल असा दुसरा खड्डा घ्यावा. खड्ड्याच्या तळाशी दोन फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा. जमिनीच्या पातळीवर चार इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे दोन्ही खड्डे जोडावेत. ओढ्याच्या पाण्यातील पालापाचोळा, कचरा हे पहिल्या खड्ड्यात स्थिरावतील आणि कणविरहित पाणी पाइपद्वारे दुसऱ्या खड्ड्यात जाईल. दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारे जाऊन विहीर पुनर्भरण होईल. यासाठी १००० ते १५०० रुपये इतका खर्च साधारणपणे अपेक्षित आहे.

विहीर पुनर्भरणासाठी कोणती विहीर निवडावी?

ज्या विहिरीला रब्बी हंगामाच्या शेवटी पाणी कमी पडते. 

विहिरीचे बांधकाम सिमेंटमध्ये अथवा पक्‍क्‍या दगडांत झालेले असावे.

विहिरीचे ठिकाण हे साठणाऱ्या पाण्यापासून 50 मीटरच्या आसपास असावे. 

विहिरीच्या भोवतालची जागा चिबड किंवा पाणथळ होणारी नसावी. 

सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विहिरीची निवड करू नये. 

भुरकट व गडद पाणलोट क्षेत्रातील विहिरी पुनर्भरणासाठी उत्तम ठरतात, त्यातील जलस्तर साठवणुकीसाठी योग्य असतात.

 

शेतकरी मित्र

विजय भुतेकर सवणा

9689331988

English Summary: Benefit will remain, well recharge process do this Published on: 20 March 2022, 01:32 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters