माती परिक्षण करुन पिकास त्या परिक्षणाच्या आधारे खते देणे हे शास्रिय दृष्ट्या योग्यच आहे. बहुतेक करुन माती परिक्षण करीत असतांना आपणास सांगण्यात येते की, ज्या ठीकाणी पिक नसेल किंवा खते पडत नसतिल त्या ठिकणाची माती आणावी. हे शेताच्या मातीचे परिक्षण करण्यासाठी योग्य आहे. कारण यातुन शेतात असणारी अन्नद्रव्ये आपणास कळणार आहेत. परंतु पिक तर सबंध शेतात वाढत नाही, त्याच्या मुळ्या ह्यातर काही ठराविक भागच व्याप्त करित असतात. आपण पिकांस खते देतांना देखिल ती मुळांच्या परिसरातच देत असतो. जमिनीच्या रासायनिक अभिक्रिया ह्या मुळांजवळील परिसरातच जास्त प्रमाणात घडत असतात.
जमिनीत टाकली जाणारी विविध सेंद्रिय व रासायनिक खते काही प्रमाणात तेथिल जमिनीवर परिणाम करित असतातच. तेव्हा माती परिक्षणाचा जेथे पिक किंवा पिकाच्या मुळ्या नाहीत तेथिल रिपोर्ट हा जेथे मुळ्या आहेत त्यापेक्षा वेगळा हा असणारच. वर्षानुवर्षे पिकास खते देवुन देवुन त्या परिसरातील खतांचे प्रमाण वाढलेले असणारच हा प्रकार साधराणतः फळबागांबाबत जास्त घडेल, मग आपण माती परिक्षण अहवालानुसार कसे काय पिक संगोपन करु शकतो. कारण तो रिपोर्ट तर जेथे मुळ्या नाहीत तितला आहे.माति मध्ये उत्पादन
जेथे पिकाच्या मुळा वाढतात तो परिसर रायझोस्पिअर म्हणुन ओळखला जातो.
रायझोस्पिअरच आपणासाठी महत्वाचा आहे. माती परिक्षण करित असतांना या परिसरातील रासायनिक खते टाकण्यापुर्वी माती काढुन तीचे परिक्षण केल्यास काही महत्वाच्या बाबींचा तपास लावणे सोपे जाईल, जसे त्या परिसरातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, तसेच त्या परिसरातील कॅटायन एक्सचेंज कॅपिसिटी शिवाय नेहमीच्या पध्दतीने तपासलेल्या नुमन्याशी याची पडताळणी करुन बघता येईल. ज्यावरुन आपणास आपल्या विविध रासायनिक तसेच सेंद्रिय खतांच्या वापराने जमिनीवर काय परिणाम होतो आहे हे लक्षात येईल.
म्हणजे एखादी व्यक्ती आजारी पडली असता त्याची रक्त तपासणी केली जाते आणि त्याच्या रक्तामध्ये कोणत्या घटकांचे प्रमाण कमी जास्त आहे हे पूर्ण शरीराचे आजाराचे मुख्य कारण त्यातून कळून येते. आणि ज्या गोष्टीची कमतरता असेल त्याच्यावर औषधोपचार डॉक्टरकडून केले जातात. अगदी तशाच प्रकारे मातीची तपासणी करून माती मध्ये कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य घटक कमी-जास्त आहेत हे तपासले जाते. अशाप्रकारच्या जमिनीची मशागत शेतकर्याने करणे अपेक्षित असते आणि तसे केल्यास उत्पन्न आणि उत्पादन वाढण्यास मदत होते.
Share your comments